एका कॉलवर मिळते रूग्णाला मोफत रक्त

29

 ▪️ युवकांचा समाजोपयोगी उपक्रम, विदर्भ रक्तसेवा ब्रह्मपुरी व्हाॅटसॲप ग्रुप रुग्णांना वरदान

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.16ऑगस्ट):-रक्तदाना अभावी कुणाचाही जीव जावु नये,या तळमळीने ब्रह्मपुरी शहरातील कुर्झा येथील मयुर प्रदिप मेश्राम व पारडगाव येथील प्रशांत तलमले या दोन युवकांच्या संकल्पनेतून विदर्भ रक्तसेवा व्हाॅटसॲप ग्रुप तयार केला.गरजुना या ग्रुप वर संदेश पाठवल्यास एका कॉलवर रूग्णाला मोफत रक्त पुरवठा केला जातो.या उपक्रमामुळे आतापर्यंत तिनशेच्या वर रूग्णाला जीवनदान मिळाले आहे.

पैशांने सर्वकाही घेता येईल मात्र रक्ताची बाह्यनिर्मिती कदापि करता येणार नाही.विशिष्ट गटाचा रक्त हवा असल्यास पैसे असुनही वेळीच तो रक्त गटाचा व्यक्ती किंवा रक्त मीळत नाही.गरिबांचे तर हाल होतात.वेळीच रक्त न मिळाल्याने रुग्णांना जीव गमावण्याची वेळ येत आहे.ही अनेक रूग्णालयातील वस्तुस्थिती आहे.याचा अभ्यास करून गरीब, गरजू, सामान्य रुग्णाला गरजेनुसार वेळीच रक्त निःशुल्क उपलब्ध व्हावे यासाठी नागपूर, भंडारा, चंद्रपूर,वर्धा, गडचिरोली,या जिल्ह्यातील रूग्णांना वेळीच रक्त निःशुल्क उपलब्ध करून देण्यासाठी धावपळ करावी लागते.ब्रम्हपुरी तालुक्यातील जागरूक युवकांना एकत्रित करून ब्रह्मपुरी शहरात आलेल्या रूग्णाला सहजपणे रक्त पुरवठा केला जातो.
मयुर ने हा ग्रुप १८ मार्च २०२० रोजी विदर्भ रक्तसेवा समाजोपयोगी व्हाॅटसॲप ग्रुप तयार केला.यासाठी युवराज करंडे, प्रफुल्ल कंरडे,जितु सेलोटे , सुधीर पिल्लारे,आदी युवकांनी मोलाचं मदत केली.विर्दभ रूग्ण सेवेला आठ महिने पुर्ण झाले आहे.या माध्यमातून जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरच्या रूग्णाला ३०० च्या जास्त रूग्णाला मोफत रक्त पुरवठा केला आहे. आतापर्यंत शेकडो गरजू रुग्णांचे जीव वाचवण्यात या ग्रुप ला यश आले आहे.आजुबाजूच्या परिसरातील अनेक रक्तदाते जुळले आहेत.प्रत्येक सदस्यांच्या ध्येया नुसार योगदान दिले जाते. व रक्त गरजुच्या सेवेसाठी प्रत्येकांने योगदान दिले पाहिजे या ग्रुप चे ब्रिंद व्याक्य आहे.

 

प्रतिक्रिया:-

सध्या स्थितित कुणीही कुठल्याही गरिब गरजु रुग्णांकरिता रक्त हवे असल्यास कॉल करून मदत मिळवता येते.संपर्क झाल्यानंतर कुठल्याही खाजगी किंवा सरकारी रुग्णालयात अर्धा ते एक तासात रक्त पुरवठा केला जातो.मी आतापर्यंत अनेकदा रक्तदान केले आहे.कोविड च्या काळतही सेवा सुरू च आहे.

मयुर प्रदिप मेश्राम
विदर्भ रक्तसेवा ब्रह्मपुरी प्रमुख