अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसा निमित्त नोटबुक वाटप व वृक्षारोपण

    34

    ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चंद्रपुर(दि.16ऑगस्ट)- दिल्ली राज्यात शैक्षनिक क्रांती घडवणारे शिक्षण स्वास्थ, स्वस्त विज, मुफ्त पाणी यासारख्या मुलभुत मुद्द्यावर दिल्ली जिंकणारे अाम अादमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री मा. अरविंद केजरीवाल यांना वाढदिवसा निमीत्त अाज दि. 16 अाॅगस्टला नेहरु नगर येथे वृक्षारोपण व नोटबुक वाटप करण्यात अाले. अाम अादमी पार्टी माहानगर तर्फे अापचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री श्री. अरविंद केजरीवाल यांचा वाढदिवसा निमित्त “नेहरु नगर” येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात अाले.तर वार्डातील गरजु विद्यार्थांना नोट बुक व पेन वाटप करण्यात अाले. यावेळी अाप शहर माहानगर उपाध्यक्ष योगेश अापटे, कोषाध्यक्ष सिकंदर सागोरे, सोशल मीडीया प्रमुख राजेश चेड्डगुलवार, गिरीश राउत,भास्कर शेंडे अजय उईके, प्रविण धारणे, सुरज बुरडकर, सचिन ठक, प्रविण सोमलकर तसेच नेहरु नगर मित्रमंडळाचे पदाधिकारी महेश गौरकार, रमेश बोबडे,शफीखान पठान, दिलीप गोहने, सचिन करंडे, गजानन बावने, उईके मामा, गणेश शेंडे. अनुराग पिंपळकर, अमन शेडे. अादींची उपस्थिती होती.