नगर परिषद चिमुर कामगारांच्या वतीने एकदिवसीय काम बंद आंदोलन

14

🔸 नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.18ऑगस्ट):-महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटना व संघर्ष समिति यांचे संघटने मार्फ़त 17 आगष्ट रोजी राज्यभरात नगर परिषद कर्मचारी संघटना शाखा चिमुरच्या माध्यामातून अभ्यंकर मैदान चिमुर येथे एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले.
आपल्या मागण्या शासन स्तरावर मांडण्या करिता व शासनाचे लक्ष वेधन्याकरिता सदर आंदोलन करण्यात आले.

शासकीय कर्मचारी प्रमाणे 100℅ वेतन कोषागार मार्फ़त देने, नगरपरिषद मधील लिपिक वरिष्ठ लिपिक यांना वरिष्ठ वेतन श्रेण्या लागू करने, शिपाई पाणीपुरवठा व वर्ग 4 कर्मचारी याना पदोन्नति देने, अंतिम तप्प्यातिल रोजनदारी कर्मचार्यान्चे कार्यरत नगरपरिषद मधे समावेश करने, व इतर मागण्या संदर्भात सदर आंदोलन करण्यात येत आहे, सदर आंदोलन महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगर पंचायत/संवर्ग कर्मचारी संघटना व संघर्ष समिति शाखा चिमुर वतीने करण्यात आले, या आंदोलनात राकेश चौगुले, राहल रणदिवे, संजय शेलोकर, मिनाज शेख हेमंत राहुलवार, अमोल सहारे, घनश्याम उइके, शरद पाटिल, प्रमोद पवार, पुष्पा कामडी, स्नेहल दाभेकर, प्रवीण कारेकार, सह अन्य कर्मचारी उपस्थित होते