मातीची एॅलर्जी असणाऱ्या पंजाबराव कृषी विद्यापीठातील अधिकाऱ्यांवर कार्यवाही करा – अक्षय शिंदे

5

✒️माजलगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

माजलगाव(दि.18ऑगस्ट):-महाराष्ट्रातील अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात स्वातंत्र्य दिना निम्मित फळबाग लागवड करण्यात आली मात्र लागवड करतांना कृषी विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मातीचीच हेटाळणी केली. कृषी विद्यापीठात फळबाग लागवड कार्यक्रमात सुटाबुटात असलेल्या अधिकाऱ्यांच्या पायाला आणि कपड्यांना मती लागू नये म्हणून शेतातील काही भागात ताडपत्री टाकून फळबाग लागवड केली आणि ज्या झाडांना पाणी घालायचे होते त्या झाडापर्यंत पोहचण्यासाठी लाकडी फळ्यां टाकल्या आणि पाणी दिले. या अधिकाऱ्यांच्या अश्या आघोऱ्या प्रकारामुळे महाराष्टातील शेतकऱ्यांच्या तसेच सर्वसामान्याच्या भावना दुखावल्या आहेत. शेतकऱ्यांमध्ये संशोधनाच्या बळावर प्रगत शेतीचे तंत्रज्ञान पोहचविण्याची जबाबदारी ज्या कृषी विद्यापीठांवर असते तसेच शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्याची जबाबदारी ज्या विद्यापीठाकडे असते जर त्यांनाच मातीची एलर्जी असेल तर मग या लांखो रुपये पगार असलेल्या विद्यापीठातील अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांना काय उपयोग असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
स्वातंत्र्य दिनादिवशी शेतकऱ्यांच्या अस्मितेचा अवमान करणारे कृषी विद्यापीठातील अधिकारी कुलगुरू डॉ. विलास भाले , संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, तसेच कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांच्यावर सरकारने तसेच प्रशासनाने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या भावना दुखावनाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा शिवसंग्रामचे युवा नेते शेतकरी पुत्र अक्षय शिंदे यांनी सरकारला दिला आहे.