आंबोली -असोला मार्गावर गड्डे देत आहेत अपघाताला आमंत्रण

12

🔹दोन दिवसामध्ये प्रशासनाने उपाययोजना करावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार :- शुभम मंडपे

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.21ऑगस्ट):-आंबोली -असोला मार्गावर मोठे_मोठे गड्डे पडलेले आहेत मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे ,या गड्ड्यांमुळे शेतकऱ्यांना व शेतमजुरांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे . या रस्त्यावरील गड्डे अपघाताला आमंत्रण देत आहे व रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होत आहे मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे तरी यावेळी, सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे . दोन दिवसामध्ये प्रशासनाने उपाययोजना केली नाही तर रस्ता रोको आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी रस्तावरच्या गढ्यातले पाणी काढून युवा मंच आंबोली तर्फे उपाययोजना करणात आली आहे ,यावेळी आंदोलनाचा इशारा देतांना सम्यक विद्याथी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे व युवा मंच आंबोली चे पदाधिकारी शरद वांढरे व विशाल नंन्नावरे ऊस्थित होते.