कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत दूरक्षेत्र बरबडा येथे शांतता समितीची बैठक

    48

    ✒️माधव शिंदे (जिल्हा, प्रतिनिधी नांदेड)मो:-७७५७०७३२६०

    नांदेड(दि.21ऑगस्ट):-गणेशोत्सव / मोहरम 2020 विषयी बरबडा ता.नायगाव जि. नांदेड येथील जवाहरलाल नेहरू विद्यालय येथील‌ गोविंदरावजी धर्माधिकारी बरबडेकर सांस्कृतीक सभागृहात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर, प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक मा.श्री दताराम राठोड साहेब अपर पोलीस अधीक्षक नांदेड ,के.एस.पठाण साहेब सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कुंटूर ,बालाजी मोहनराव मद्देवाड साहेब संरपच बरबडा,पोलीस जमादार दामोदर साहेब, सुवर्णकार साहेब ,गावातील प्रतिस्ठीत नागरीक, बरबडा व बरबडा परिसरातील पोलीस पाटील व सर्व वर्तमान पत्राचे पत्रकार कार्यक्रमास उपस्थित होते.यावेळी मा. अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड साहेब यांनी बरबडा गावात फक्त एकच गणपती मूर्ती स्थापना , कपिलेश्वर मंदिर बरबडा, येथे करीत आहात त्याबद्दल बरबडा गावाचे अभिनंदन केले आहे . व कोरोना (19) च्या संदर्भात सविस्तर माहिती दिली व जनतेनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. अशी विनंती केली. यावेळी सर्वांनी सहकार्य करण्यास संमती दिली आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडा चे शिक्षक श्री . एन.एम. तिप्पलवाड (एन टी सर) यांनी केले.