केज तहसिल कार्यालयासमोर नायब तहसीलदार यांच्या विरोधात शेकाप, शिवसंग्राम,रिपाईच्या वतीने केले बोंबमारो आंदोलन

24

✒️नवनाथ पौळ(केज तालुका प्रतिनिधी)
मो:-8080942185

 केज(दि.25ऑगस्ट):- तहसिल कार्यालयात वर्षानोवर्ष ठाण मांडून बसलेले नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांची बदली करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे राज्यकारिणी सदस्य भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली बोंबमारो आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात शेकापचे , शिवसंग्राम व रिपाइंचे प्रमुख पदाधिकारी व विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यात प्रामुख्याने भाई मोहन गुंड, दादा वाघमारे, बालासाहेब, रिपाइं (आठवले गट) चे तालुका अध्यक्ष दिपक कांबळे सर ,नैमुलजहांगिर शेख इत्यादी उपस्थित होते.