✒️शेख आवेज(सेनगावविशेष प्रतिनिधी)
मो:-8308862587

सेनगाव(दि.25ऑगस्ट):-हिंगोली तालुक्यातील घोटादेवी येथील वैजनाथ पावडे महाराष्ट्राच्या डोंगराच्या कुशीत व डोंगरदर्‍यात भटकंती करणाऱ्या धनगर समाजाच्या उन्नतीसाठी गेल्या अठरा वर्षांपासून सततच्या चळवळीत कार्यरत असलेले रासपा जिल्हाप्रमुख व मल्हार सेना जिल्हा सरचिटणीस वैजनाथ पावडे यांना धनगर समाज युवा मल्हार सेना च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या यशवंत समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबाबत संघटनेच्या वतीने पत्र दिले.

वैजनाथ पावडे हे गेल्या 15 ते 20 वर्षांपासून महाराष्ट्रातील धनगर समाजाचा एसटी अनुसूचित जमातीच्या आरक्षण प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून झगडत आहेत. त्यांनी धनगर समाजाला आरक्षण व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक रास्ता रोको आंदोलने केली. त्यामुळे त्यांना यशवंत समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान धनगर युवासेना मल्हार सेनेच्या वतीने गौरव करण्यात आला.

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED