अंबाजोगाई नजीक गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा

16

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.27ऑगस्ट):-अंबाजोगाई शहरालगत असलेल्या वान नदीच्या पात्रात व तालुक्यातील राडी गायराणात अवैध व बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या गावठी दारू अड्ड्यावर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात २ लाख ७३ हजार १०० रुपयांचे गुळ मिश्रित रसायन नष्ट केले असून दारू वाहून नेण्यासाठी वापरण्यात येत असलेला घोडाही ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान वान नदी पात्रात बेकायदेशीररीत्या गावठी दारू बनविणा-या सात व राडी येथील एका आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा वाजता करण्यात आली.
आरोपी फरार नबी जुम्मा रेगीवाले , चाँद लाला रेगीवाले , सुभान चंदु गवळी,विजय किशोर कांबळे,गफार काशीम गवळी ,अकबर बाबु पप्पुवाले,पाशा सत्तार चौधरी अशी आरोपींची नावे असून सर्व आरोपी फरार आहेत,