✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.28ऑगस्ट):- महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चुन गेवराईत वाळू माफीया वाळूचा सर्रासपणे उपसा करतात. मात्र यांचे याकडे दुर्लक्ष का होते? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. कारण गेल्या दोन दिवसापासून पोलीसच वाळू माफीयांवर कारवाया करत असून आज तिन ट्रॅक्टर वाळू उपसा करण्याची किनी व एक इंजन ताब्यात घेतले. गेवराई तालुक्यातील आगरनांदूर परिसरातून वाळू माफीया वाळूचा उपसा करत असल्याची माहिती स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच आज सकाळी त्यांनी त्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी तेथे वाळूने भरलेले तिन ट्रॅक्टर, वाळू उपसा करणारी किनी, व एक इंजिन आढळून आले.पोलीसांनी हे सर्व ताब्यात घेवून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी घेवून जात असतांना नांदूर फाटा येथे आल्यावर एका ट्रॅक्टर चालकांने गेवराईकडे ट्रॅक्टर घेण्याऐवजी ते औरंगाबादकडे घेवून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या एका पोलीस कर्मचार्‍यांने त्याला ट्रॅक्टर गेवराईकडे घेण्याचे सांगितल्याने ट्रॅक्टर नांदूर फाटा येथे पलटी झाले. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात वाळू माफीयांसह पकडलेले ट्रॅक्टर पळून नेणार्‍या चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. स्थानिक पोलीस व बीड येथून येऊन एसपीच्या पथकाच्या कारवाया सुरूच असून महसूल प्रशासन झोपेच सोंग घेत आहे. तर रात्रंदिवस सुरू असलेल्या वाळू उपशाबाबत जिल्हाधिकारी यांना अनेक निवेदन व तक्रारी देऊनही स्थानिक अधिकार्‍यांवर त्यांचा कुठलाच वचक नसल्याचे यावरून दिसून येत आहे.

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED