✒️संतोष संगीडवर(आल्लापल्ली प्रतिनिधी)मो:-7972265275

आल्लापल्ली(दि.28ऑगस्ट):-रोजी धुळे येते काल मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे कोरोना संकटात परीक्षा न घेता जमा असलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे तसेच ह्यावर्षी शिक्षण शुल्क कमी करावे अशा रास्त मागण्या घेऊन गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) च्या विद्यार्थ्यांना मंत्र्यांच्या अंगरक्षकांनी त्यांच्यासमोरच अमानुष मारहाण केली होती, माणूसकीला काळीमा फासणाऱ्या ह्या घटनेचा भाजपा युवा मोर्चा अहेरी तालुका तर्फे आज तहसीलदार अहेरी श्री.ओंकार औतारी यांना एक निवेदन देऊन ह्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला तसेच ह्या घटनेतील दोषींवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्याची मागणी ह्या निवेदनातुन करण्यात आली, तसेच ह्यावेळी भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर तहसीलदार साहेबांशी चर्चा केली.
ह्यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार, भाजपा तालुका महामंत्री मुकेश नामेवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष गुड्डू ठाकरे, युवा कार्यकर्ते विक्की तोडसाम, आदेश मंचालवार, यश गुप्ता सह अहेरी येतील भाजयुमोचे कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED