पिक विमा कंपनीने या वर्षी मुगाचा शंभर टक्के विमा मंजुर करावा-शिरीष भोसले

15

🔴अन्यथा विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करु-शेतकरी संघटनेचा ईशारा

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.28ऑगस्ट):- गेल्या पंधरा दिवसात सततच्या झालेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या बाघबीघाडीमुळे हिरावून गेलेला आहे.संततधार पावसामुळे मुगाचे नव्वद टक्के नुकसान झाले असुन त्यावर सरकारने व विमा कंपनीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शिरीष भोसले यांनी केली आहे. 

गेल्या चार पाच वर्षाच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस पडुन पीके जोरदार आलेली होती यंदाच हंगाम चांगलं साथ देणार व चांगल पिक येणार असा विश्वास शेतकऱ्यांच्या  मनात होता.मात्र या आनंदावर निसर्गाने विरजन घालुन मुगसाह उडीद,सोयाबीन,कापुस इत्यादी पिकावर अती पावसाचा फटका बसला असुन मुगाच्या शेंगालाच कर फुटुन मुगाचे दाणे देखील काळे पडले आहेत.ऐन सनासुदीच्या तोंडावर आलेल्या या संकटावर सरकारने तसेच विमा कंपनीने विलंब न करता नुकसानभरपाई जाहीर करुन तात्काळ बॅंक खात्यात वर्ग  करावी अशी मागणी गावगड्यातुन होत आहे.

जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसापासुन सततच्या पाऊस सुरु असल्याने गेवराई बीड माजलगाव या तालुक्यातील शेतकर्याचे मुंग पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.सुरुवातीला बर्यापैकी पाऊस असल्याने यावर्षी मुगाचा पेरा वाढलेला आहे.सुरुवातीला पिकाला पोषक असा पाऊस असल्याने पिकांची परीस्थीती चांगली होती.परंतु मुंगाला शेंगा लागल्या आणि पाऊसाने उघड न दिल्याने हाता तोडांशी आलेला घास शेतकर्याकडुन हिरावला गेला आहे.शेंगा काळ्या पडल्या असुन झाडावरच कोंब फुटले आहेत.पिक जमीनदोस्त झाले असुन हातचे पिक गेल्याने मुंग तोडणीचा व उडीद तोडणीचा खर्च निघणार नाही.अशी परीस्थीती मुंग,व उडीद उत्पादक शेतकर्यावर ओढावली आहे.तसेच सततच्या पावसाने औषध फवारा मारायला विलंब झाल्याने कापुस सोयाबीन पिकांवर हि आळी पडल्याचे चित्र आहे.बोगस बियाने न उगवल्यांने शेतकर्यासमोर पुन्हा एकदा संकट उभे ठाकल्याने शेतकर्याच्या मुंग तोडणी पुर्वी तात्काळ पंचनामे करण्यात यावे,व त्या प्रमाणे झालेल्या नुकसानीचा अहवाल ग्राह्य धरुन वरीष्ठांना पाठवावा व नुकसान झालेल्या शेतकर्याना सरकारने नुकसानभरपाई व विमा कंपनीने पिकांची विमा भरपाई तात्काळ देण्यात यावी अशी मागणी शेतकरी संघटनेकडुन शिरीष भोसले यांनी केली आहे.