सुरळी येथील प्रकाश कोहरे यांच्या खचलेल्या घराची पाहणी करतांना युवा तालुकाप्रमुख निलेश कोहळे

29

✒️वरुड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरुड(दि.29ऑगस्ट):- येथूनच जवळ असलेल्या सुरळी या गावामध्ये सतत २७/८/२०२० पासुन चालू असलेल्या पावसामुळे गावातील रहिवासी प्रकाश नारायण कोहरे यांचे घर मध्य रात्री झालेल्या पावसामुळे घरावरचे छत व भिंती रात्री १.३० वाजता कोसळली असता कोणत्याही प्रकारची प्राणहानी झाली नाही.त्या नंतर सकाळी प्रकाश कोहरे त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुका प्रमुख निलेश कोहळे यांना फोन करून कळविले असता त्यांनी परीस्थिती आढावा घेतला व त्यांना आर्थिक मदतीचे आश्वासन दिले. व युवा तालुकाप्रमुख निलेश कोहळे यांनी स्वता.सोलंके पटवारी यांना बोलावून घेतले त्या नंतर प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यात आला. प्रकाश नारायण कोहरे हे वेगळे राहत असुन त्यांचे घर मातीचे व बारीक कवेलूचे आहे तरी सुद्धा त्यांना अद्यापही घरकुलाचा लाभ मिळाला नाही गावातील राजकारणामुळे त्यांचे नाव (ब) यादीत समाविष्ट न करता,(ड) यादीत टाकण्यात आले. असे यांचेच नव्हे तर अनेक गरजू गोर – गरीब लोकांचे सुद्धा(ड) यादीत नाव टाकण्यात आले. शुल्लक प्रतिष्ठेसाठी अशा प्रकाचे ईतके घाणेरडे राजकारण करून तरी यांना काय सिद्ध करायचे आहे, मा.देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी काढलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गोरगरीब गरजू कुटुंबांना घरकुलाचा लाभ देणे अनिवार्य आहे. परंतु खेड्यातील अशा संकुचित भावनेची पुढारी राजकारण करून गरजू लोकांना वंचित ठेवतात हे खेडे विभागासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की आता प्रशासक असल्यामुळे कुठल्याही प्रकारची अट नठेवता प्रकाश नारायण कोहरे यांना तात्काळ घरकुल मंजूर करून देण्यात यावे तसेच सततच्या पावसामुळे नागरीकांच्या घराचे नुकसान झाले असता त्यांना हक्काचं घरकुल तात्काळ देण्यात यावी .अशी मागणी स्वाभिमानी पक्षाचे युवा तालुका प्रमुख निलेश कोहळे यांनी यावेळी प्रशासनाला केली. त्या वेळी सुरळी चे पटवारी सोलंके साहेब व रोजगार सेवक राजू उघडे,चेतन राऊत ,ईत्यादी उपस्थित होते.