जालन्यात आज (दि.30ऑगस्ट) रोजी विविध विकास कामांचे भूमिपूजन

11

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

जालना(दि.30ऑगस्ट):-जालना नगर परिषदेतर्फे शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन दि.30 ऑगस्ट रविवार रोजी सकाळी केंद्रीय राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आ. कैलास गोरंटयाल, नगराध्यक्षा सौ.संगीताताई गोरंटयाल, उपनगराध्यक्ष श्री राजेश राऊत, श्री.भास्कर (आबा) दानवे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री नार्वेकर यांच्यासह, सभापती, नगरसेवक नगरपालिका कर्मचारी,आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले.