✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

बीड(दि.31ऑगस्ट):-तालुक्यात एके काळी विद्यार्थी चळवळीत अग्रेसर असलेलं नाव म्हणजे राम भैय्या नवले व तसेच आत्ता रयत शेतकरी संघटनेचे बीड तालुका प्रमुख व माजी. न्यायमूर्ती मुंबई हायकोर्ट बापुसाहेब देशमुख यांचे निकटवर्ती, अपंग, गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार यांना सतत मदत करणारे व या कोरोनाच्या महामारित शेवटच्या माणसापर्यंत जाऊन मदत करणारे युवक नेतृत्व राम भैय्या नवले यांचे परस्पर नाव सांगुन कुक्कडगाव येथे पोलिस पथक, एस पी पथक, तहसीलदार पथक बोलवुन गावात त्यांचे नाव बदनाम करण्याचे काम काही व्यक्ती करत आहेत व येत्या काळात या कारणांमुळे नवले यांना मोठ्या संकटांना सामोरं जावं लागणार आहे व या प्रकरणामुळे त्याच्यांवर वाळुमाफीयांचा डोळा आहे.

वाळुमाफीया जर राम नवले यांच्या जिवाशी खेळु लागले तर याची पुर्णपणे जबाबदारी ही जिल्हाधिकारी यांच्यावर असेल . त्या व्यक्तीची लवकरच तपास लावून सदरील प्रकरणाची जिल्हाधिकारी राहुल रेखावार साहेब यांनी चौकशी करून त्या व्यक्तीवर लवकरच गुन्हे दाखल करण्यात यावा.. अशी मागणी सुनील भाऊ ठोसर, राजे भाऊ मोरे, अर्जुन चाटे, नवनाथ भाऊ आडे, प्रमोद डोंगरे, बाबुराव भोईटे सर चंद्रसेन जाधव, व रयत शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी केली आहे.

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED