आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी घेतली पुरपीडितांची भेट

30

🔸पूर परिस्थितीचे व कोरोना संदर्भात आढावाही घेतले

✒️संतोष संगीडवर(विशेष प्रतिनिधी)मो:-7972265275

भामरागड(दि.10सप्टेंबर):- माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी बुधवार 9 सप्टेंबर रोजी भामरागडचा दौरा करून पुरपीडितांची भेट व अन्न धान्याचे किट वाटप केले.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, तहसीलदार सत्यनारायण सिलमवार, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सुरेश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी मिलिंद मेश्राम, सभापती गोयी कोडापे, अहेरी पंचायत समितीचे सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी भामरागड येथे आलेल्या पुरपरिस्थितीची पाहणी करून गोर गरिबांच्या परिवाराची व पुरपीडित कुटुंबाची आस्थेने विचारपूस करून अन्न धान्य वाटप केले आणि नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन देऊन महसूल अधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीचे सर्व्हे ताबडतोब तयार करावे असे निर्देशही यावेळी दिले.

भामरागडच्या पर्लकोटा नदीमुळे पावसाळ्यात वारंवार पुलावरून पाणी वाहत असते त्यामुळे नागरिकांचे जगाशी नेहमी संपर्क तुटत असतो यासाठी आता पुलाच्या कामालाही प्रारंभ होणार असून समस्या कायमचे सुटणार असल्याचे उल्लेख करून शासन जनतेच्या पाठीशी असल्याचे म्हणत पुरपीडित नागरिकांना धीर दिले.
तत्पूर्वी आ. धर्मराव बाबा आत्राम यांनी, भामरागडच्या तहसील कार्यालयात पूर परिस्थितीचा आढावा घेऊन कोरोना, आरोग्य विषयक, कुपोषण, संजय गांधी निराधार योजना, सिंचन व अन्य विविध विषयावर अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून रेंगाळत असलेले कामे ताबडतोब मार्गी लावण्याचे निर्देश देऊन विकास कामांना चालना देण्याचे सूचनाही केले.

यावेळी सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत मोडक, आदिवासी सेवक सबर बेग मोगल, इंदरशहा मडावी, रामजी भांडेकर आदी उपस्थित होते.