पिक कर्जासाठी बँकानी शेतकर्‍यांना झुलवत ठेवले

30

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.9ऑक्टोबर):-तालुक्यातील पाडळसिंगीत महाराष्ट्र ग्रामीण बैक समोर शेतकर्यांचे अमरण उपोषण पिक कर्जासाठी शेतकरी बँकाच्या दारात पहाटे पाच पासून बसतात. मात्र चार दोन शेतकर्‍यांचेच फॉर्म बँक अधिकारी घेतात. उर्वरीत शेकडो शेतकर्‍यांना कागदपत्रात त्रुटी दाखवत वापस पाठवितात.

पुन्हा ति त्रुटी दुरूस्त केली तर दुसरी त्रुटी दाखवून पुन्हा परत पाठवतात तर पाडळसिंगीच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेने नविन पिक कर्ज देण्यास शेतकर्‍यांना नकार दिल्याने आज शेतकर्‍याने पाडळसिंगी येथे बँकेविरोधात उपोषण केले.शेतकर्‍यांना बि-बियाणे खरेदीसाठी पिक कर्ज दिले जाते. मात्र शेतात पेरलेले घरात येण्याची वेळ आली तरी देखील बँकांना दिलेले टार्गेट पुर्ण केले नाही.

ज्या शेतकर्‍यांनी सर्व कागदपत्राची पुर्तता केली त्यांना देखील जाणीवपुर्वक काही ना काही त्रुटी काढून त्यांचे फॉर्म नाकारले जातात. जे पात्र शेतकरी आहे त्या शेतकर्‍यांचे अर्ज बँकांनी स्विकारावे असे सक्तीचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले असतांनाही बँक अधिकारी त्यांच्या आदेशाला केराची टोपरी दाखवितात.

तर पाडळसिंगीच्या महाराष्ट्र ग्रामीण बॅकेने शेतकर्‍यांना नविन पिक कर्ज देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी बँकेच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे.

यावेळी दत्ता जाधव, सरपंच मुजीब पठाण, उपसरपंच मनोज डरफे, शेतकरी नेते रामप्रसाद गाडे, युवा नेते विकास चौधरी, सुग्रीव लाखे, रमेश राठोड यांच्यासह आदि शेतकर्‍यांची उपस्थिती होती.