शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेसला घवघवीत यश

30

🔹महत्वाच्या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा

🔸संदीप बेडसेंच्या नेतृत्वात मिळाले यश

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी )मो:-9075716526

शिंदखेडा(दि.19जानेवारी):- विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेसला घवघवीत यश आले आहे ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीचे निकाल लागले असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संदीप त्रंबकराव बेडसेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवल्या गेल्यात त्यात महत्वाच्या ग्रामपंचायतांवर वर्चस्व कायम राहिले असून मतदारसंघात झालेल्या ६९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपैकी बिनविरोधसह १४ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचा झेंडा फडकला आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यांनंतर राज्याचे ग्रामविकास खाते महत्वपूर्ण मानले जाते 

गावपातळीवरच्या समस्या सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान या खात्याचे असते अशावेळी रस्ते, पाणी, वीज, शिक्षण आरोग्य अशा अनेक समस्या गावागावात भेडसावत असतात अशावेळी शिंदखेडा विधानसभा मतदार संघातील अनेक गावांच्या समस्या सोडविण्याकरिता संदीप त्र्यंबकराव बेडसे यांनी मतदार संघाचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि गावागावात विकासाची गंगा वहावी यासाठी गेल्या वर्षभरात अनेक कामे मतदार संघाच्या विकासासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला त्याचेच फलित म्हणून आजच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीला घवघवीत असे यश संपादन करण्यात आले.

कोरोनाच्या जागतिक महामारीत संदीप दादा बेडसें युवा मंचाच्या वतीने अनेक सकारात्मक काम करण्यात आले तालुक्याच्या निर्णायक अशा ग्रामपंचायतींवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला आहे. येणाऱ्या काळात मतदारसंघातील प्रत्येक गावात विकास कसा होईल यासाठी आराखडा सर्वांसमोर मांडण्यात येणार आहे. मतदारसंघातील शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे खंबीरपणे उभी असल्याचे दिसून येते.

🔹राष्ट्रवादी
विरदेल, दरखेडा, दलवाडे, बाभुळदे, जातोडा, मेलाणे, हट्टी, सोनशेलु, पढावद, खलाणे, डांगुर्णे, धावडे, दसवेल, लोहगाव-वसमाने, निशाणे

🔸महाविकास आघाडी
वरूळ-घुसरे, बेटावद, ऐचाळे, वडदे, महाळपुर, आमराळे,राष्ट्रवादी सदस्य सोनेवाडी, हातनुर, अजंदे, वायपुर, कर्ले, झिरवे,कोट शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात घवघवीत यश मिळाले आहे त्याबद्दल सर्व जनतेचे मतदारांचे आभार. येणाऱ्या काळात गावागावात विकास कशा पद्धतीने करता येईल या अनुषंगाने कामे करणार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवडून आलेल्या गावात आपली सत्ता आली त्या गावात आपली सत्ता गेली असं न करिता सर्वसमावेशक असे काम मतदारसंघातील प्रत्येक गावात केले जाईल मंत्रालय स्तरावर ती सर्व प्रश्न सोडविण्याकरिता मी पहिले ही कटिबद्ध होतो आणि आजही कटिबद्ध आहे ग्रामविकास खाते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असलेले महत्त्वाचे खाते आहे.

हे आमच्या पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब तसेच ग्राम विकास मंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाने गावाच्या विकासाकरता मी पुढील काळात प्रयत्न करणार आहे पुन्हा एकदा सर्व मतदारांचे आभार–संदीप त्रंबकराव बेडसे ( राष्ट्रवादी कॉग्रेस नेते शिंदखेडा