गंगाखेड तालुक्यात मंगळवारी 19व्यक्ती कोरोनाबाधित 222 रुग्णांवर उपचार सुरु

37

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.21एप्रिल):-शहरासह तालुक्यात सद्यस्थितीत 222 कोरोनाबाधित व्यक्तींवर उपचार सुरु असल्याची माहिती डॉ. योगेश मल्लूरवार यांनी दिली.गंगाखेड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाने विळखा घालण्यास सुरू केले असताना काही गावात नागरिकांच्या सतर्कतेमुळे संसर्ग वाढला नाही. परभणी जिल्ह्यात दि. 17 एप्रिल ते 22 एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू केली असली तरी गंगाखेड तालुक्यासह जिल्हाभरात दररोज रुग्णांचा आकडा वाढलेलाच दिसून येत आहे.

मंगळवारी (दि.20) गंगाखेड तालुक्यात 19 व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सध्या 222 रुग्णांपैकी 99 कोरोनाबाधित रुग्ण गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात व कस्तुरबा गांधी शासकीय वसतिगृह येथे उपचार घेत आहेत तर 35 रुग्ण पुढील उपचारासाठी अन्य दवाखान्यात पाठविण्यात आले असून 95 रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.

दरम्यान, नागरिकांना कुठलाही त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कोरोना तपासणी वेळेवर करावी. तसेच मास्क, सॅनिटायझरच्या वापरासह सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन गंगाखेड कोविड विभागाचे प्रमुख डॉ. योगेश मल्लुरवार यांनी केले आहे.