बिबट्याचे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मृतकाच्या कुटुंबियांस दिला ५ लाखाचा धनादेश

32

🔹आमदार समिर कुणावार यांचे हस्ते स्विकारला धनादेश

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.३जुलै):-बिबटयाचे हल्ल्यात नुकतेच मृत्युमुखी पडलेल्या शेडगाव येथील रहिवासी कोठेराव रामभाऊ टिपले यांच्या कुटुंबियांस वनविभागाच्यावतीने १५ लाख रुपयाची मदत घोषित करण्यात आली,काल दि.२ जुलै रोजी यापैकी ५ लाख रुपये प्रथम हप्ता कुटुंबियांना देण्यात आला,सदर रकमेचा धनादेश आमदार समिर कुणावार यांचे हस्ते टिपले कुटुंबियांना देण्यात आला.सदर धनादेश आमदार समिर कुणावार यांचे जनसंपर्क कार्यालयात मृतकाची पत्नी श्रीमती शोभा टिपले यांच्या सुपुर्द करण्यात आला.

समुद्रपुर वनपरिक्षेत्रातील शेडगाव परिसरात सदर पशुपालकास बिबट्याने गंभीर जखमी केले,त्यातच त्या पशुपालकाचा दुर्दैवी मृत्यु झाला.त्याचे परिवारास वन विभागाच्यावतीने ५ लाख लाख रुपये सानुग्रह अनुदानाची मदत घोषित करण्यात आली होती.काल दि.२ रोजी आमदार समिर कुणावार यांचे शुभहस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर, क्षेत्र सहाय्यक विजय धात्रक तसेच मृतकाचे कुटुंबिय
पत्नी शोभा कोठेराव टिपले,मुलगा शैलेश कोठेराव टिपले तसेच नातेवाईक विठ्ठल श्यामराव झाडे इत्यादि उपस्थित होते.यापुढील १० लाख रुपये पुढे टप्प्याटप्प्याने देण्यात येणार असल्याचे वनविभागाचेवतीने सांगण्यात आले.