कोरोना काळामध्ये छत्र हरवलेल्या मुलींना आ. देवेंद्र भुयार यांनी घेतले दत्तक !

29

🔸मुलींच्या शिक्षणाची, आरोग्याची, स्वीकारली संपुर्ण जबाबदारी !

✒️वरुड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरुड(दि.12ऑक्टोबर):-मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी हाती घेतलेल कार्य उदात्त माणुसकीच मूर्तिमंत उदाहरण म्हटल्यास वावग ठरणार नाही. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी प्राण गमावले. तर काही मुलांनी आपले पालक गमवल्याने ही मुले अनाथ झाली. या अनाथ मुलांना आधार देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार पुढे आले आहेत.

वरुड शहरातील आठवडी बाजार परिसरातील श्री.मनोज मारोतराव लाड, यांचे कोविड 19 च्या काळात गंभीर आजाराने दुःखद निधन झाले, कुटुंब प्रमुखाचे निधन झाल्याने त्यांचे संपुर्ण कुटुंब उध्वस्त झाल्यामुळे लोकप्रतिनिधि या नात्याने सामाजिक बांधिलकी जपत मनोज लाड यांच्या दोन मुली कु.मयुरी मनोज लाड, वय 12 वर्ष व कु. जयश्री मनोज लाड, वय 11 वर्ष या दोन्ही मुलींना दत्तक घेऊन मुलींच्या शिक्षणाची, आरोग्याची, संपुर्ण जबाबदारी आमदार देवेंद्र भुयार यांनी स्वीकारून मयत मनोज लाड यांच्या कुटुंबाला या कठीण परिस्थितीतीवर मात करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी सहकार्य करण्यास बांधिल असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले.

कोरोना काळामध्ये ज्यांचे आई-वडील मृत्यूमुखी पडले आहेत, त्या मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतला आहे. कोरोनामुळे छत्र हरवलेल्या अनेक मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांचे शिक्षण व आरोग्याची पूर्ण जबाबदारी घेऊन मुलींना दत्तक घेण्यात आले आहे.

प्रतिक्रिया —
मातृ व पितृची उणीव ही कोणीही कितीही पैसे, सोने,चांदी देऊन पूर्ण करू शकत नाही, परंतु आपणही समाजाचे काही देणं लागतो या निस्वार्थ हेतू व आत्मिक तळमळीने तिळमात्र मदत म्हणून आम्ही अनाथ व निराधार पाल्यांना मायेची थाप देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. —- देवेंद्र भुयार आमदार मोर्शी विधानसभा .