चामोर्शी : आष्टी येथे एक दिवसीय कराटे प्रशिक्षण आणि बेल्ट ग्रेडिंग परिक्षा संपन्न

30

🔸रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कराटे खेळाचा नियमित सराव आवश्यक : कपिल मसराम

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)

चामोर्शी(दि.20ऑक्टोबर):-नॅशनल शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा संचालित आष्टी येथील कराटे प्रशिक्षण केंद्रात कलर बेल्ट ग्रेडिंग परिक्षा घेण्यात यावी असे आदेश इंडिया चिफ सेन्साई संजय इंगोले यांनी दिले.आदेश येताच मागिल काही महिन्यांपासून कराटेचा सराव लक्षात घेता ज्या विद्यार्थ्यांचा पूढच्या परिक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण झाला व जे खेळाडू परिक्षा देण्यासाठी पूर्णपणे तयार होते.

अशा खेळाडूंसाठी नॅशनल शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया ची गडचिरोली जिल्ह्यातील शाखा आष्टी येथील कराटे प्रशिक्षण केंद्रात एक दिवसीय एडवांस कराटे प्रशिक्षण आणि कलर बेल्ट ग्रेडिंग परिक्षेचे आयोजन मंगळवार दिनांक १९ आक्टोंबर २०२१ ला सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा आष्टी येथे सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्हा मूख्य कराटे प्रशिक्षक सेन्साई कपिल मसराम आणि चामोर्शी तालुका मूख्य कराटे प्रशिक्षक सेन्साई अनिकेत हजारे , महात्मा ज्योतिबा फुले वरिष्ठ महाविद्यालयाचे शारिरीक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. श्याम कोरडे यांच्या नेतृत्वाखाली आष्टी, ईल्लूर आणि ठाकरी परिसरातील ८२ कराटे खेळाडूंनी सहभाग घेऊन एक दिवसीय एडवांस कराटे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून बेल्ट ग्रेडिंग परिक्षेत प्राविण्य प्राप्त करत वेगवेगळे बेल्ट प्राप्त केले. सदर बेल्ट ग्रेडिंग मध्ये कु. रिया जयंत वाट , कु. कांचन छत्रपती बावणे आणि कु. गायत्री संतोष झाडे यांनी उत्कृष्ट व चांगले प्रदर्शन करत परिक्षकांना प्रभावीत केले .

आष्टी येथील कराटे खेळाडूंसाठी नवीन व आधुनिक कराटेचे विविध कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी मूल तालुका मूख्य कराटे प्रशिक्षक सेन्साई इमरान खान आणि मूल शहर मूख्य कराटे प्रशिक्षक सेन्साई निलेश गेडाम यांनी उत्कृष्ट व सोप्या पद्धतीने प्रशिक्षण देवून आष्टी येथील कराटे खेळाडूंची मने जिंकली. तर कलर बेल्ट ग्रेडिंग परिक्षेसाठी महाराष्ट्र चिफ सेन्साई विनय बोढे यांनी मूख्य परिक्षक म्हणून पार पाडली व सर्व कराटे खेळाडूंना परिक्षकाच्या हस्ते बेल्ट देण्यात आला.

बेल्ट ग्रेडिंग यशस्वी होण्यासाठी यश बामणकर , राज दूर्गे , प्रशांत डोंगरे , मोहित दूर्गे , सूबोध बावणे , स्मिथ जोरगलवार , शूभम गांधारे , कांचन बावने , अंजली कुकूडकर , जानवी दिवसे , नंदिनी मेश्राम , ऋतूजा गांधारे , सोनाली मोरे यांनी अधिक मेहनत व परिश्रम घेतले.

या प्रसंगी प्रमूख पाहूणे म्हणून सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका एस . डी. गलबले , शिक्षकवृंद एम.यू. खोब्रागडे , बि.ए. क्षिरसागर , पि.टी . वाकडे , आय .एम . शेरेकर , हरिष पांडे , विलास कुकूडकर , छत्रपती बावणे , बंडू कामडे पालकवर्ग , प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.