भावा! तुझ्यासाठी…..!

28

विसरून सारे दुःख माझे

झेलून झेलून थकले रे

एकदाची धाव घेतली माहेरची

भावा! तुझ्यासाठी…..

मी सुखी तर तू सुखी

आस ही मनातली मनातच ठेवून

पाडते कर्तव्य पार कैक वर्षांपासूनी

लपवून कष्ट माझे…

प्रसन्न चेहरा दाखविते हासूनी

भावा! तुझ्यासाठी….

वहिनी माझी बहिण होते मोठी

तुझी लेकरे माझी रे

तुझे सुख पाहुनी आनंद होते

दुःख तुला नकोच कधी रे..

माझी मागणी काहीही असेल जी

कधीच न सांगते

ओठावर असूनीही

भावा! तुझ्यासाठी…

प्रेमाने बोलत जा..

दिसली तेव्हा हसत जा..

व्याप तुझा आजच्यापुरता

कर बाबा! बाजूला थोडा,

या छोट्या बहिणीसाठी

काही नको! तुझे मला रे

तुझेच ते सर्व रे..

भाऊ मला आहे

याचे समाधान राहिलं तेच पुरे..

प्रत्येक ‘भाऊबीज’

माझ्या लाडक्या भावासाठी…!!!

✒️अमोल चंद्रशेखर भारती,नांदेड(मो- 8806721206)