उमरखेड तहसिल अंतर्गत चाललेल्या अंदाधुंद कारभाराला आळा घालावा-भीम टायगर सेना

27

🔸भीम टायगर सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.11नोव्हेंबर):- तहसिल अंतर्गत विविध विभागांमध्ये सर्वसामान्य गरजु नागरिकांची अक्षरशः लुट होत असल्याने तहसिलदारांच्या अंदाधुंद कारभाराची चौकशी करून दलालराज संपवावे अशी मागणी तालुका भिम टायगर सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

उमरखेड तहसिलदार म्हणून रुजू झाल्यापासून शिस्तीचा बागुलबुवा दाखवित आपल्या विश्वासू अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या दलालां अंर्तगत सर्वसामान्य गरजु नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणे हा एकमेव कार्यक्रम त्यांनी राबविला असल्याचा आरोप करून भिम टायगर सेनेने तहसिलदार आनंद देऊळगावकर यांचे अत्यंत विश्वासू असलेले निवासी नायब तहसिलदार डांगे व लिपीक तिडके यांच्या मार्फत सर्व सामान्य गरजूंची लुट होत आहे . अव्वल कारकून तिडके यांच्याकडे अव्वल कारकुन या टेबलसह, पुरवठा विभागाचा पासिंग टेबल , रेकॉर्डचा टेबल, रेशनकार्ड वितरण टेबल असे चार वरकमाईचे टेबल त्यांना बक्षीस देण्यात आले. हे चार टेबल सांभाळतांना त्यांनी आपल्या हाताखाली खासगी व्यक्तींची दलाल म्हणून नियुक्ती केली. त्यांना सरकारी पगार नसल्याने त्यांच्या पगाराची व्यवस्था त्यांच्याकडे खेड्यापाड्यातून आलेल्या गरजू व्यक्तींकडून शासनाच्या नियमाव्यतिरिक्त दलालांच्या कामाबाबत मेहनताना घेतल्याशिवाय त्यांचे काम होत नाही.

स्वत:ची कामे स्वतः आणल्यास ती फेटाळली जातात मात्र दलालांमार्फत आल्यास नायब तहसिलदार डोळे मिटवून सहया करतात याव्यतिरिक्त सेतुमधून जातीचे प्रमाणपत्र, आधिवास, राष्ट्रीयत्व , ऐपतीचे प्रमाणपत्र , नॉन क्रिमीलेअर, प्रतिज्ञापत्र उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठीही शासनाच्या नियमांव्यतिरिक्त आगाऊ रक्कम मोजावी लागते त्यामुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाले असून, याबाबत योग्य चौकशी करून सर्व सामान्यांची लुट थांबवावी तसेच तहसिल कार्यालयात दररोज वावरणाऱ्या दलालांची सिसीटीवी फुटेज तपासून चौकशी करावी व त्यांचे विरुद्ध पोलीस कार्यवाही करावी व उमरखेड तहसिलदारांच्या अंदाधुंद कारभाराला आळा घालावा अशा आशयाचे निवेदन भिम टायगर सेनेचे शहराध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर, कुमार केन्द्रेकर (तालुका संपर्क प्रमुख), कैलास कदम (तालुका अध्यक्ष), प्रफुल दिवेकर, नितीन आठवले, शुद्धोधन दिवेकर (उपशहराध्यक्ष रिपब्लिकन सेना), माही धुळेकर , बुद्धभुषण इंगोले, राहुल तपासे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.