बेकायदेशीर मुरुम वाहतूक बंद करा- धावडे ग्रामस्थांची अप्पर तहसिलदाराकडे मागणी….

30

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)

दोंडाईचा(दि.17नोव्हेंबर):- धावडे ग्रामपंचायत हद्दीच्या गट नंबर 209 मधून मुरूम उत्खनन बेकायदेशीर रीत्या सुरु असून ते तात्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी धावडे ग्रामस्थानी अप्पर तहसीलदार यांचे प्रतिनिधी एन.एन.सोनार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.आज धावडे ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोंडाईचा शहरातून बाम्हणे रस्त्यालगत रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे त्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी माती आणि मुरूमचा भराव करण्यात येत आहे तो लागणारा मुरूम हा नाममात्र रॉयल्टी भरून व पाच हजार ब्रास मुरूम वाहतुकीची परवानगी घेऊन ट्रॅक्टर आणि डंपरच्या सहाय्याने रात्रंदिवस बेकायदेशीर मुरूम वाहतूक सुरू आहे ही वाहतूक तात्काळ बंद करावी अशी मागणी धावडे ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्या कडे केली आहे.

धावडे ग्रामपंचायत यांनी मुरूम वाहतुकीसंदर्भात ना हरकत दाखला देतात ग्रामस्थांना व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेतले नाही. व सरपंच आणि ग्रामसेवक यांनी परस्पर ठराव करून ना हरकत दाखला दिला परंतु गट नंबर 209 हा गुरेचरणासाठी राखीव आहे त्या ठिकाणी सामाजिक वनीकरण विभागा मार्फत झाडे लावली होती ती झाडे तोडून हजारो ब्रास मुरूम वाहतूक सुरू आहे. परवानगी घेण्याच्या दोन-तीन दिवसा आगोदर मुरूम वाहतूक सुरू झाली ही वाहतूक तात्काळ बंद करावी गट नंबर 209 मधून मुरूम काढल्याने गुरेचरण जमिन नष्ट होऊन गुराढोरांना चारण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही. म्हणून मुरूम वाहतुकीला ग्रामस्थांचा विरोध आहे निवेदनाची दखल घेऊन तात्काळ मुरूम वाहतूक बंद करावी अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल. असा ईशारा देण्यात आला आहे.

सदर निवेदनावर ॲंड ज्ञानेश्वर पाटील, माजी सरपंच रतिलाल पाटील, जगदीश सूर्यवंशी, जगन्नाथ पाटील, सुकाम भिल, माजी उपसरपंच रवींद्र रामराजे, नानाभाऊ पिंपळे रामसिंग भिल,छगून रामराजे, ज्ञानेश्वर पाटील,ग्रामपंचायत सदस्य रवींद्र रामराजे,शांताराम सूर्यवंशी,माजी सरपंच प्रकाश पाटील,कांतीलाल पाटील, अमृत भिल,राजेंद्र पाटील, आधार पाटील,रविंद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थ स्वाक्षऱ्या होत्या..