बेशरम जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या निषेधार्थ वाजतगाजत बेशरमाच्या फुलांनी खड्डे भरणार!

30

🔸आंदोलनापुर्वीच आज खड्डे बुजवण्यास सुरूवात; शहरातील निकृष्ट रस्त्याप्रकरण- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.21नोव्हेंबर):- शहरातील नगररोड, बार्शीनाका, जालना रोड आदि भागातील खड्डे ,त्यामुळे होणारे अपघात तसेच शहरातील अस्वच्छता,अस्त-व्यस्त घनकचरा ,तसेच कचरा सफाई कामगाराचे कंत्राट रद्द करण्यात यावे, नाल्याची साफसफाई, रस्त्यावरील मोकाट जनावरांचे वास्तव्य आदि प्रकरणात संबधितांवर कारवाई करण्यात यावी यासाठी ४ ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनानंतर तसेच विविध दैनिकातुन बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हादिकारी बीड यांनी जिल्हा प्रशासन आधिकारी नगर पालिका प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांना निवेदनातील नमुद मुद्यांबाबत दखल घेऊन आपल्या स्तरावरून तात्काळ चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करून संबधितांना परस्पर अवगत करण्याबाबत आदेश दिले होते ,परंतु अस्वच्छता, रस्त्यावरील घनकचरा, नाल्याची साफसफाई याविषयी सुधारणा झाल्याचे दिसुन येत नाही.

*बेशरम जिल्हाप्रशासन व लोकप्रतिनिधींच्या निषेधार्थ बेशरमाच्या फुलांनी खड्डे भरणार:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर*
______
बीड शहरातील नगररोड, जालना रोड, बार्शी रोड आदि ठिकाणी वारंवार होणारे खड्डे लोकप्रतिनिधी व त्यांच्या ठेकेदार कार्यकर्त्यासाठी भ्रष्टाचाराचे कुरण असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आधिका-यांशी संगनमतानेच डांबराऐवजी काळे तेल,डांबराचा अत्यल्प वापर, भुकटी आदि वापरून खड्डे बुजवण्यात येतात निधी उचलण्यात येतो मात्र आठवडा भरातच पुन्हा खड्डे उघडे पडलेले दिसुन येतात यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभाग आधिकारी-लोकप्रतिनिधींच्या बेशरम प्रवृतीच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड, शेख युनुस च-हाटकर, संदिप जाधव, नितिन सोनावणे, डाॅ.सुदाम तांदळे, एस.एम. युसुफभाई, मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद ईलियास, आदिंनी दि.२२ नोव्हेंबर सोमवार रोजी वाजतगाजत नगररोड भागातील खड्डे बेशरमाच्या फुलांनी भरण्यात येणार असल्याचे पत्रकात नमुद केले आहे.

*ऊद्याच्या आंदोलनापुर्वीच आजच खड्डे बुजवण्यास सुरूवात*
_____
सोमवार दि.२२ रोजी नगररोड भागातील खड्डे बेशरमाच्या फुलांनी भरण्यात येऊन जिल्हाप्रशासन व लोकप्रतिधिंच्या बेशरम प्रवृत्तीच्या निषेधार्थ “बेशरमाच्या फुलांनी खड्डे भरो आंदोलनाचा ईशारा दिल्यानंतर आज दि.२१ नोव्हेंबर रविवार रोजीच जिल्हाप्रशासनाने खड्डे बुजवण्यास सुरूवात केली आहे.