कुंभेजळगाव येथे मळणी यंत्रात तोल जावून महिला जागीच

63

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड))9075913114

गेवराई(दि.12मे):-उन्हाळी बाजरीचे खळे चालू असतांना मळणी यंत्रात महिला गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मळणी यंत्रात गेल्यानंतर महिलेचे शिर धडा वेगळे झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील कुंभेजळगाव येथे गुरुवार सकाळी घडली.

तालुक्यातील कुंभेजळगांव येथे गुरुवार रोजी सकाळी आठ वाजता बाजरीचे खळे मळणी यंत्रव्दारे चालू होते. मळणी यंत्रात बाजरी टाकत असतांना सुमित्रा सुदाम पांगरे (वय 30) वर्ष यांचा तोल गेल्याने त्यांना मळणी यंत्राने आतमध्ये ओढले. यावेळी सुमित्रा पांगरे यांचे शिर धडा वेगळे झाले. आणि जागीच मृत्यू झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.