वरुड तालुक्यातील पूरबाधित गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघणार — आमदार देवेंद्र भुयार

32

🔹मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक संपन्न !

✒️वरुड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

वरुड(दि.27मे):- तालुक्यातील सन १९९१ मधील पूरबाधित झालेल्या गावांचे पुनर्वसन करणे व पुनर्वसित झालेल्या गावाला दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सन २०१९ मध्ये मोर्शी शहराचे पुरहाणीमुळे झालेल्या नुकसानाबाबत व उपाय योजना करण्याबाबत मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे मंत्रालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीमध्ये आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड मोर्शी तालुक्यातील अनेक वर्षांपासून वनवास भोगणाऱ्या पूरग्रस्त गावांचा मागील १० वर्षांपासून हेतू पुरस्परपणे राजकीय वादामुळे पुनर्वसनापासून वंचित राहिल्याची खंत आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली. घरांच्या बांधकामाकरिता मोबदला मिळालाच नसल्याने भापकी वासीयांनी पुनर्वसनाकडे पाठ फिरविली आहे. मागील काही वर्षांपासून शासन दरबारी हा प्रस्ताव धूळखात असल्याने आमदार देवेंद्र भुयार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मोर्शी विधानसभा मतदार संघातील वरुड तालुक्यातील सन १९९१ मध्ये आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्या हातूर्णा, पळसवाडा, भापकी, या गावांचे विशेष बाब म्हणून सुरक्षीत ठिकाणी पुनर्वसन नागरी सोई सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी, २०१९ मध्ये मोर्शी शहरामध्ये आलेल्या महापुरामुळे मोर्शी शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना नुकसान भरपाई देऊन योग्य उपाय योजना करण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे रेटून धरली त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील १९९१ मधील पुरामुळे बाधित झालेल्या गावांमध्ये पुनर्वसन करतांना देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधा देण्याबाबतच्या कामांबाबत सुधारित परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ जिल्हा प्रशासनाने सादर करावेत, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले .
वरुड तालुक्यातील पुनर्वसित गावातील मूलभूत सुविधा ज्या गावांमध्ये यापुर्वी नागरी सुविधांची कामे झाली नाहीत अशा ठिकाणी फॅक्ट फाइंडिंग कमिटी स्थापन करण्यात आली आहे. कमिटीने आपला अहवाल तयार केला असून त्यानुसार आठ दिवसात मदत व पुनर्वसन विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले .

मोर्शी शहरासह वरुड तालुक्यातील पूरबाधित गावातील समस्यांबाबत जिल्हा प्रशासनाने वस्तुस्थितीची पाहणी करून कोणत्या स्वरूपाची कामे करणे आवश्यक आहे याचा पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करावा. प्रस्तावामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत याची योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केल्या.यावेळी बैठकीला मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार देवेंद्र भुयार, प्रधान सचिव मदत व पुनर्वसन, जिल्हाधिकारी पावनीत कौर, उपसचिव मदत व पुनर्वसन, जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.