“नागरिकांच्या ज्वलनशील प्रश्नांवर प्रहार आक्रमक”

30

🔸भर पावसात केले आंदोलन..!

🔹रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात बेशरमीचे झाडे लावून सा.बा चा केला निषेध….!

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.12 जुलै):-सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या उमरखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गो.सी. गावंडे महाविद्यालय पर्यंतच्या रस्त्याचे अक्षरशः चाळणी झाल्याचे पहावयास मिळत आहे.

ह्या रस्त्यावर टोंगळ्या एवढ्या गड्डे पडले आहे. त्या रस्त्याच्या गड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहन चालकाला त्या गड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक प्रकारचे अपघात घडत आहेत. त्या रस्त्याला शाळा महाविद्यालय असल्याने ए-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्या रस्त्यावर अनेक प्रकारचे ग्रामीण भाग जोडलेले आहेत.

आणि या ग्रामीण भागातील लोकांना उमरखेड ही बाजारपेठ असल्याने त्या रस्त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून होतो. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे सदर रस्ता दुरुस्ती करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

प्रहारच्या इशारा नंतरही गेंड्याची कातडी पांगरलेल्या सार्वजनिक बांधकाम उपविभागीय उप अभियंत्याला जाग आली नसल्याने मुसळधार पावसात सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर पडलेल्या गड्यांमध्ये बेशरमीचे झाड लावून सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा निषेध केला.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख सय्यद माजीद सय्यद पाशा, शहर प्रमुख राहुल आनंदराव मोहितवार, तालुका संपर्कप्रमुख अंकुश पानपटट्टे, गजानन धोंगडे, जय किसान पुरी ,अभिजीत गंधेवार, प्रवीण इंगळे, सुनील खोलगडे,मनोज वानखेडे, चंद्रकांत गायकवाड, राजकुमार शिरगिरे, आधी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

【आंदोलनानंतर प्रहार कार्यकर्त्यांना केली पोलिसांनी डिटेन】

उमरखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असणाऱ्या खड्ड्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेशरमीचे झाडे लावून सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय व संबंधित अभियांत्रिक यांचा निषेध करत आंदोलन केल्यानंतर सर्व प्रहार कार्यकर्त्यांना पोलिसांनी डिटेन करून पोलीस स्टेशन उमरखेड येथे नेले.