उस उत्पादकांचे प्रश्न तात्काळ निकाली काढा…! – रिपब्लिकन युवा सेना

99

🔹अन्यथा जनआंदोलन करणार

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड दि.19ऑगस्ट):-रिपब्लिकन युवा सेनेच्या शिष्टमंडळाची शिरुर साखर कारखाना वाकोडी ता.कळमनुरी जि. हिंगोली येथील जनरल मॅनेजर श्री.एस.सी.नातु साहेब यांच्या सोबत उसउत्पादकांच्या अनेक अडी – अडचणीं विषयी पाऊण तास विस्तृत व सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी उसउत्पादकांच्या विविध मागण्या संदर्भात 30 – 40 ऊस उत्पादकांच्या स्वाक्षरीसह निवेदन देण्यात आले त्यात प्रामुख्याने

◆ ऊस गळीत हंगाम 2021- 22 मधील उसाचा हंगाम संपुन चार ते पाच महिने झाले असून आपल्या कारखान्यांनी ऊस उत्पादकांची उर्वरित पूर्ण एफआरपी अद्याप अदा केलेली नसुन ती उर्वरित पूर्ण एफआरपी ही एकरक्कमी स्वरूपात 10 दिवसाच्या आत ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा करण्यात यावी.
◆एकाच क्षेत्रातील असलेल्या इतर साखर कारखान्यांच्या तुलनेने आपण जाहीर केलेल्या साखर उताऱ्यामध्ये व ऊसतोड – वाहतूकखर्च ह्यामध्ये असलेली तफावत पाहता तो पुनरावलोकन करून नव्याने जाहीर करण्यात यावा.

◆आपल्याकडून एफआरपी देण्यासाठी पाच महिन्याचा लागलेला विलंब पाहता आरआरसी कायद्याप्रमाणे 15 टक्के व्याजासह रक्कम देण्यात यावी.

तसेच उमरखेड तालुक्यातील रखडलेल्या उसलागवड नोंदी ह्या तात्काळ पूर्ण करून घेण्यात याव्या.

गतवर्षी सदर कारखान्याला गेलेल्या उसउत्पादकाची नोंद इतर कारखाने वगळुन ऊस नेत नसल्याकारणाने आपल्याकडून सदर उसउत्पादकांची जवाबदारी घेऊन त्या पद्धतीने यंत्रणा राबविण्यात यावी अशी आग्रही भूमिका घेण्यात आली.

उर्वरित पूर्ण एफआरपी ही एकरक्कमी स्वरूपात 10 दिवसाच्या आत उसउत्पादकाच्या खात्यावर रक्कम जमा न झाल्यास, साखर आयुक्त पुणे यांच्याकडे आपल्या विरुद्ध पुढील कार्यवाही करण्यात येऊन, उसउत्पादकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज रोजी रिपब्लिकन युवा सेने तर्फे कारखाना प्रशासनाला देण्यात आला.

यावेळी रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, उमरखेड शहराध्यक्ष शुद्धोधन भाऊ दिवेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.