पती पत्नीच्या घरगुती वादातुन पती ने केला पत्नीचा खून

165

🔸उमरखेड च्या वेंकटेश नगर ची घटना चाकू ने केले सपासप वार

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.28ऑगस्ट):- घरगुती वादातून पती ने पत्नी चा खून केल्याची घटना शनिवार रोजी दुपारी 4 च्या दरम्यान उमरखेड च्या वेंकटेश नगर येथे घडली.

विशाल पोंगाडे रा. पुसद जिल्हा यवतमाळ असे आरोपी पतीचे नाव असून पत्नी मृतक अश्वीनी विशाल पोंगाडे (वय 33 वर्ष ) ही आपल्या माहेरी आली होती. यादरम्यान आरोपी विशाल हा दुपारी पत्नीस भेटण्यासाठी आला होता.

यादरम्यान दोघांचा वाद झाला. वादानंतर आरोपी पतीने सोबत आणलेल्या चाकू ने पत्नीचा पाठीमागे सपासप वार करून हत्या केली व पळून गेला.

पत्नीच्या चीरखण्याचा आवाजाने शेजारी राहत असलेले लोकं जमा झाले. त्यांनी आश्विनी हिला शेजारच्या कृजर ने सरकारी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

चौकट :- आरोपी विशाल हा सराईत गुंड प्रवृत्तीचा असून त्यावर अनेक गुन्हे दखल असल्याची माहिती मिळाली आहे.

आरोपीचे आपल्या पत्नीशी नेहमीच खटके उडायचे. त्यामुळे ती दररोजच्या जाचाला कंटाळून माहेरी उमरखेड येथे आली होती.

आरोपीने पत्नी घरी एकटी असल्याचा फायदा घेत पत्नी अस्वीनी चा खून केला आणि आपल्या सी डी डीलक्स ने फरार झाला होतो.पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेत 4 तासात अटक केली.