लाॅयड्स ग्राम काॅलनीत किक्रेट टुर्नामेंटची चौथी फेरी

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.22नोव्हेंबर):- लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीकडून लाॅयड्स ग्राम काॅलनीत किक्रेट (टेनिस बाल) चे आजचे उत्साहात खेळण्यात आले.

लाॅयड्स मेटल उद्योगाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी श्री. रितेश वाठ म्हणाले,भारतात बर्‍याच वर्षांपासून क्रिकेटचा खेळ खेळला जात आहे, तो एक अतिशय प्रसिद्ध आणि रोमांचक खेळ आहे. हा खेळ मुलांना खूप आवडतो, सहसा लहान मैदान, रस्ते इत्यादी कोणत्याही लहान मोकळ्या जागांवर क्रिकेट खेळण्याची त्यांना सवय असते. मुलांना क्रिकेट व त्यासंबंधीचे नियम व कायदेविषयक माहिती खूप आवडते. भारतातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणार्‍या खेळांपैकी क्रिकेट सर्वात प्रसिद्ध आहे. लोकांमध्ये क्रिकेटची लोकप्रियता इतकी जास्त आहे की हा खेळ पाहण्याकरिता प्रेक्षकांची गर्दी इतर कोणत्याही खेळाकडे फारच कमी जाते.

स्वयंघोषित साईबाबांचे अवतार!

क्रिकेट हा एक व्यावसायिक पातळीवरील मैदानी खेळ आहे जो बर्‍याच देशांकडून खेळला जातो. या मैदानी खेळामध्ये 11 खेळाडूंचे दोन संघ आहेत. 50/20 षटक पूर्ण होईपर्यंत क्रिकेट खेळले जाते. यासंदर्भातील नियम आणि कायदे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि मर्लबॉर्न क्रिकेट क्लबद्वारे शासित व नियमन केले जातात. हा खेळ कसोटी सामने आणि एकदिवसीय आणि टी -20 आंतरराष्ट्रीय सामने म्हणून खेळला जातो. हा खेळ प्रथम 16 व्या शतकातील दक्षिण इंग्लंडमध्ये खेळला गेला. तथापि, 18 व्या शतकाच्या दरम्यान ते इंग्लंडच्या राष्ट्रीय खेळामध्ये विकसित झाले.

*क्रिकेटचा इतिहास*

ब्रिटीश साम्राज्याच्या विस्तारादरम्यान, हा खेळ परदेशात खेळला जाऊ लागला आणि 19 व्या शतकात पहिला आंतरराष्ट्रीय सामना आयसीसीकडून प्रत्येकी 10-10 सदस्यांच्या दोन संघात घेण्यात आला. क्रिकेट हा एक अतिशय प्रसिद्ध खेळ आहे जो इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण-आफ्रिका इत्यादी जगातील अनेक देशांमध्ये खेळला जातो.

सावरकर का नाम बदल दो, विनायक से वीर कर दो!

असे लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री.रितेश वाठ सांगण्यात आले.

काॅलनीत टेनिस बाल किक्रेट स्पर्धेत बरेच टिम सहभागी झाले, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कमर्शिअल आणि CPPP.

स्पर्धेचा पहिला सामना मेकॅनिकल टिम एंव इलेक्ट्रिक टिम यांच्यात होऊन मेकॅनिकल नि बाजी मारली तसेच मॅन ऑफ द मॅच अंकुर पोरस यांना मिळाला,३१ बालात ८१ धावा घेतले.

संविधान Indian condition मानणारे जागृत आहेत काय ?

दुसरा सामना हे कर्मेशिअल टिम एंव पावर प्लान्ट प्रोजेक्ट (Cppp) यांचात होऊन (व्यावसायिक)कर्मेशिअल संघाने जिंकला आणि मॅन ऑफ द मॅच सुशील,राधेश्याम गांधी यांनी तीन विकेट घेतल्या, सागरने चांगली फलंदाजी केली कर्णधार राजीव सिंग टीमनी बाजी मारली.दोन्ही सामने हे मोठ्या उत्साहात लाॅयड्स ग्राम काॅलनी झाले व यात परिसरातील नागरिक मोठ्या उत्साहात उपस्थित होते.यावेळी लाॅयड्स मेटल्स कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.