✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.21 जानेवारी):-शहरातील शहीद भगतसिंग मराठी शाळा क्रमांक 2 उमरखेड येथे मकरसंक्रांत निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम शाळेतील सर्व महिला शिक्षिका यांच्यावतीने आयोजित केला होता.कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थ्यांच्या महिला पालक यांना बोलावून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन व हळदी कुंकू लावून स्वागत करण्यात आले.
हळदी कुंकाच्या कार्यक्रमानिमित्त शाळेमध्ये महिला बालकांसाठी संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन केले होते व सर्व उपस्थित महिलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी पार पाडली या स्पर्धेमध्ये विजेत्या वानखेडे ताई हे ठरल्या.या कार्यक्रमाचे आयोजन सोनेवार मॅडम, नंदनवार मॅडम,बोके मॅडम, पवार मॅडम, शिंदे मॅडम, नरवाडे मॅडम, वाढवे ताई, पाईकराव काकू, टेंभरे ताई इत्यादींनी केले होते.