✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.15सप्टेंबर):-केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या विरोधात तसेच अतीवृष्टी मुळे नुकसान झालेल्या ऊस,मुग,कापुस व तुर या खरीप पिकांची नुकसान भरपाई विनाविलंब मिळावी या मागण्या संदर्भात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी गेवराई तहसीलदार यांना निवेदन दिल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरीष भोसले यांनी दिली आहे.

शेतकरी प्रश्नांवर नेहमीच अग्रेसर भुमिका घेणार्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी आज कांद्यावर लादलेल्या निर्यातबंदीच्या विरोधात व इतर मागण्या संदर्भात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात तिव्र शब्दात निषेध नोंदवला.
कृषीप्रधान देश म्हणून मीरवणार्या भारत देशातील शेतकर्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली असुन बळीराजाला माणसिक आधाराबरोबरच आर्थिक आधार सुद्धा देणे गरजेचे झाले आहे.समस्येचा महापुर डोक्यावरुन जात असल्याने शेतकरी आता कर्जाच्या जाचाला कंटाळुन थेट आत्महत्यसारख गंभीर पाऊल उचलत आहे.

नैसर्गिक आपत्तीबरोबरच,दुष्काळ,अतीवृष्टी,बोगस बि-बियाणे, पिकांना मीळनारा अपुरा भाव,कर्ज देण्यासाठी बॅंकाची उदासीनता,कर्जाचा वाढत चाललेला डोंगर,बंद पडलेले शासकीय हमीभाव केंद्र,इत्यादी समस्यांनी शेतकर्यांच जगन मुश्किल असुन त्याचा परिणाम म्हणून आता बळीराजाचे ऊद्या खायचा काय हा प्रश्न आणि या परिस्थिती पर्यत वेळ आली आहे.सरकार येतात जातात पण शेतकरी हीताच्या आणि शेतकरी स्वातंत्र्य्याच्या ठोस उपाययोजना कोणतच सरकार करत नाही असा आरोप देखील यावेळी करण्यात आला.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कांदा निर्यात बंदीला संबंध शेतकरी संघटनेने तहसीलदाराला निवेदन देऊन तिव्र शब्दात निषेध नोंदवला असुन हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी केली आहे.

तसेच या वर्षी अतीवृष्टी मुळे नुकसान झालेल्या ऊस,मुग,तुर,सोयाबीन व कापुस खरीप वर्गीय पिकांचे पंचनामे करुन त्याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी व विमा कंपनीने पिकांचा पुर्ण विमा मंजूर करावा.तसेच राष्ट्रीयकृत दत्तक बॅंकांनी शेतकर्यांचे पिक कर्जाचे प्रकरण विना विलंब मार्गी लावावेत,खरीप पिकांचे हमीभाव केंद्र सुरु करावेत या ज्वलंत मागण्या घेऊन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले.

बीड, महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED