✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-830886258
ब्रम्हा(दि.23सप्टेंबर):- येथे वाशीमचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या हस्ते ब्रम्हा येथील जगदंबा माता तीर्थ क्षेत्राचे डोम सेट चे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अर्थ व बांधकाम सभापती विजू कानझोडे, शिवसेना तालुका प्रमुख रामदास मते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक महादेव सावके, शिवसेना शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, उपशहर प्रमुख नामदेवराव हजारे, जगदंब युवा ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शुभमभाऊ मुसळे, तसेच नितीन कावरखे, ब्रम्हा येथील शिवसेना शाखा प्रमुख तथा संस्थांनचे उपाध्यक्ष रामप्रसाद मुसळे, संस्थान चे अध्यक्ष नारायण मुसळे, सचिव मदन मुसळे, गणेश मुसळे, ब्रम्हा गावचे सरपंच संदीप मुसळे, ब्रम्हा गावचे नवनियुक्त प्रशासक प्रमोद बदरखे, माजी सरपंच त्र्यंबकराव मुसळे, सोनू मुसळे, सुभाष नवघरे व तसेच गावकरी उपस्थित होते.