🔺पायाचा पडला तुकडा

✒️मनोज गाठले(शेगाव-बु,प्रतिनिधी)मो:-9767883091

शेगाव(बु)-(दि.23सप्टेंबर):- वरोरा चिमूर नॅशनल हायवे रोड चे काम एस आर के कंट्रक्शन कंपनी कड़े असून यांच्या अलगरजी पनामुुुळे चांगल्या रोड चे खोड़काम करुन चांगल्या रस्त्याचे तीन तेरा वाजवले आहे.ही कंपनी जनतेच्या सत्कार्य साठी नसून येथील व परिसरातील जनतेच्या जीवावर उठली असल्याचे दिसून येत आहे.

आज(दि.23सप्टेंबर)दुपारी 4 वाजताचा सुमारास पाहायला मिळाला भर धाव वेगाने जात असलेल्या कंपनीच्या ट्रक ने एका दुचकिला धड़क दिल्याने यात दुचाकी वर असणारे  श्री शरद जागो बदकी वय 48 वर्ष राहणार महालगाव , यांचा पायाचा पडला असून त्याची प्रकृती गंभीर आहे तर दूसरा नीलेश शंकर आवारी याची सुद्धा प्रकृति चिंता जनक असल्याचे सांगण्यात आले.

तर त्यांचावतीसरा साथीदार रूपेश वघाड़े याला कसलाही प्रकारची इजा झाली नसून सुदैवने हा बचावला हे तिन्ही इसम महालगाव चे रहिवासी असल्याचे सांगण्यात आले एस आर के कंट्रक्शन कम्पनिचा हाइवा टिप्पर ट्रक क्र ap – 02 – tA 32 90 या वाहनाने जबर धडक दिली असल्याने या वाहनाला पोलीस स्टेशन येथे ताब्यात घेऊन पुढील करवाई सुरु आहे. तर गंभीर असलेल्या रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे हलविन्यात आले असून पुढील उपचार सुरु आहे.

सदर याचा तपास येथील ठानेदार श्री सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात श्री किशोर पिरके करित आहे
विशेष म्हणजे या कंपनीच्या आपल्या खाजगी वादामुळे हे काम पूर्ण होत नाही  मात्र यात यांचा नसून परिसरातील जनतेला मात्र याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मरण किंवा अपंगत्व पात्कारवे लागत आहे.त्यामुळे कार्यरत असलेल्या कंपनी वर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन ही कंपनी काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी जनता करु लागली आहेत.

वृत्त लिहे पर्यंत ट्रक चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

Breaking News, महाराष्ट्र, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED