प्रहार दिव्यांग संघटना मुखेड च्या वतीने नूतन गटविकास अधिकारी टि.के. भालके यांचा सत्कार

32

✒️चांदु आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी) मो:-9307896949

मुखेड(दि.19ऑक्टोबर):-रोजी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालय मुखेड येथे नुकतेच गटविकास अधिकारी पदावर रुजू झालेले श्री टी. के. भालके यांचा शाल व हार घालून सत्कार करण्यात आला दिव्यांगांच्या काही प्रलंबित मागण्या असतील तर उदा. तीन % पाच % व अन्य प्रश्नाबाबत चर्चा केल्यानंतर त्या तात्काळ सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले.

यावेळी प्रहार दिव्यांग संघटना मुखेड च्या महिला ता. अध्यक्ष राजश्री गवलवाड, चंद्रबाई देवमारे उपाध्यक्ष, केवळ वळगे सचिव, सरोजना धारासुरे कापरवाडी, मंगल कांबळे, लक्ष्मीबाई कांबळे दापका गु., संगीता भास्करे चिवळी, हरी अनमुलवाड व श्रीहरी अनमुलवाड आदी हजर होते.