पिंपरी- चिंचवड येथे कोजागिरी निमित्ताने विविध कार्यक्रम

49

✒️पिंपरी-चिंचवड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पिंपरी-चिंचवड(दि.31ऑक्टोबर):-जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील रिवर ए ऐज सोसायटी या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमे निमित्त लहान मुलांचे डान्स, व अनेक महिलांचे कार्यक्रम करण्यात आले.

यावेळी जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य पिंपरी-चिंचवड शहरचे अध्यक्ष श्री आकाश भोसले, कार्यध्यक्ष आमोल नाणेकर, शहरातील जनशक्ती युवा संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी रिवर ऐज सोसायटीचे अध्यक्ष सौ. सुनीता परदेसी, चेरमन श्री मोठे साहेब,सेक्रेटरी विजय बडगुजर, व तसेच सर्व पदाधिकारीअजिंक्य वायल, आमोल सोनकांबळे, सागर कतोरे, चौधरी, सिध्देश शिंदे, यांनी जनशक्ती युवा संघटना पिंपरी-चिंचवडचे आभार व्यक्त केले.