डॉ.श्रीकांत रामचंद्र धुमाळ यांना DPID कोविड19 योध्दा 2020-Dadasaheb Phalke Icon Award Films(DPIAF) पुरस्कार जाहिर

27

✒️सुनिल ज्ञानदेव भोसले(पुणे प्रतिनिधी)

पूणे(दि.20नोव्हेंबर):-डॉ.श्रीकांत रामचंद्र धुमाळ यांना DPID कोविड19 योध्दा 2020 -Dadasaheb Phalke Icon Award Films(DPIAF) पुरस्कार दि.23 नोव्हेंबर रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.

श्रीकांत रामचंद्र धुमाळ हे पुण्यामध्ये राहत असुन लॉकडाऊन कालावधीत गरजु नागरिकांना अत्यावश्यक अन्नधान्य किट 1400 गरजु नागरीकांना व आदिवासी पारधी समाजातील 170 गरजु परिवारांना दिले, हे काम पाहुन त्यांना DPIAFकोरोना योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

यामध्ये काही द्रस्ट नी ऑनलाइन तर काही द्रस्टनी त्यांना प्रत्यक्ष बोलुन पुरस्कार जाहीर केला. डॉ.श्रीकांत धुमाळ हे निस्वार्थी भावनेने समाजसेवा गेल्या 21वर्षापासुन करत आहे, तसेच समाजसेवा केल्याबद्दल त्यांना मानद डॉक्टर हि पदवी बहाल करण्यात आली. डॉ. श्रीकांत धुमाळ करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे व त्यांचे हे कार्य तरूण पिढीला प्रेरणादायी आहे,डॉ. श्रीकांत धुमाळ यांच्या कार्यास शुभेच्छा व भविष्यात सुद्धा त्यांनी अशाच प्रकारची गरजवंतांची सेवा करावी अशी अपेक्षा आहे.