कांग्रेसच्या शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश

33

✒️विजय तोकला(सिरोंचा प्रतिनिधी)मो:-9403477377

सिरोंचा(दि.25नोव्हेंबर):-अहेरी विधानसभा मतदारसंघाचे
आमदार तथा माजी राज्यमंत्री मा.धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा शहरातल्या कांग्रेस व भाजपा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व विजयांचे शिल्पकार मा.ऋतुराज भाऊजी हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केला.

सिरोंचा नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण जाहीर होताच पक्ष प्रवेश शिगेला पोहचला असतानाच कांग्रेस व भाजपा कार्यकर्त्यांच्या धक्का बसला आहे. अहेरी मतदारसंघाचे विकासनेते मा.धर्मरावबाबा आत्राम साहेबांवर विश्वास ठेवून तथा सौ.भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर) तसेच मा.ऋतुराज हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 25नोव्हेंबर रोजी कांग्रेसचे कट्टर कार्यकर्ते श्री.रवी आकुदरी यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश केला व राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाले,व त्यांचा अभिनंदन करण्यात आले.

कार्यकर्ते कांग्रेसच्या विचार व आचार बाबत नाराज असल्याने शेकडो कार्यकर्ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे घड्याळ हाताला बांधणार असल्याची चर्चा होती.मात्र आज त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक श्री.रवीभाऊ उर्फ रवीअण्णा राल्लाबंडीवार
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष श्री.मधुकर कोल्लूरी,श्री.देवा यनगंधला रा.युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष, श्री.उज्वल तिवारी,श्री.गणेश बोधनवार, विजय तोकला नगरसेवक, श्री.सुरेश तीपट्टी पत्रकार, नरेश कंती, रंजित पेद्दपेली, व कार्यकर्ते उपस्थित होते.