विखुर्ले येथे भारतीय संविधान दिवस साजरा

29

🔸२६/११मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना श्रध्दांजली अपर्ण

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526

शिंदखेडा(दि.27नोव्हेंबर):- तालुक्यातील मौजे विखुर्ले येथे भारतीय संविधान दिवसाच्या निमीत्ताने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.तसेच दिनांक २६/११/२००८रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्यात आपले पोलिस कर्मचारी शहिद झाले होते. त्या घटनेला आज १२ वर्ष झाले. त्या घटनेचा आज निषेध करण्यात आला. व शहिद पोलिस कर्मचाऱ्यांना श्रध्दांजली अपर्ण करण्यात आली.

तत्पुर्वी विखुर्ले गावाचे माजी सरपंच जगदिश पंडित तिरमले, दिपक आधिकार पाटील, यांच्या हस्ते भारतीय संविधान , भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. दिपक पेंढारकर , रविंद्र बाबूराव तिरमले, दिपक शांतीलाल तिरमले, योगेश बापू तिरमले, दिपक राजेंद्र तिरमले, राहूल बागले, जिभाऊ केदार, संदीप पाटील, सुनिल रामराजे, समाधान भिल संजय केदार, आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी आम्हि विखुर्लेकर जनजागृती गृपचे नवनाथ तिरमले यांनी संविधानाचे उद्देशिकेचे वाचन केले. चंद्रकांत गुलाब पाटील यांनी संविधानाविषयी अतिषय महत्वपुर्ण अशी माहिती आपल्या भाषणाच्या माद्यमातून सांगितली. बेरोजगार भूमिहीन मजूर व असंघटित कामगार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता नवनीत बागले यांनी सुत्रसंचालक केले तसेच सर्व कार्यक्रमास विशेष सहकार्य त्यांचे लाभले.