हणेगाव मतदान केंद्रावर पदवीधर मतदार संघाचे निवडणुकीत 217 पैकी 155 मतदारांनी हक्क बजावला

45

✒️ महादेव उप्पे(देगलूर प्रतिनिधी)मो:-९४०४६४२४१७

देगलूर(दि.२डिसेंबर):-औरंगाबाद पदवीधर मतदार निवडनुकीची प्रक्रिया हणेगाव येथे शांततेत पार पडली. हणेगाव येथील मतदान केंद्राचा क्रमांक ४४२ असून यावेळी एकूण २१७ मतदानापैकी १५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आतापर्यंतच्या पदवीधर मतदार निवडणूकीतील ही पहिलीच वेळ आहे की एवढं जास्त मतदारांनी मतदान केले आहे. यावेळी ७०% एवढा मतदान झाले आहे. सकाळपासूनच मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

यावेळी महाविकास आघाडीचे व भाजपा, वंचित ,प्रहार आणि अपक्ष उमेदवार यांचे कार्यकर्ते आपल्या मतदारांना बोलावून घेऊन मतदान करून घेतले.जिल्हा परिषद शाळेत मतदान प्रक्रिया पार पाडली असून यावेळी शारीरिक अंतर वतोंडाला मास्क लावून मतदारांनी मतदान केले.कोरोणाचा संसर्ग पाहता आरोग्य विभाग कर्मचारी यांनी मतदारांचे तापमान व सैनिटायजर करून मतदानासाठी पाठवण्यात आले.

यावेळी कोणताही अनुचित प्रकिर घडू नये म्हणून मरखेल पोलिस स्टेशनचे सहा. पो. निरीक्षक अदित्य लोणीकर, पो. उप. निरीक्षक अजित बिरादार, हणेगाव बीटचे जमादार कणकवले, जोगपेठे, इंगोले, ताजियोदिन पोलिस पाटिलयांनी मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी नियंत्रण ठेवून होते. यावेळी मतदान केंद्र अध्यक्ष राउत आर. ए. डॉ. बरकतुल्ला, पांचाळ डी.एम.सुक्ष्म निरिक्षक रामोड जि.जी.व आरोग्य विभागाचे खांडगावे बरबडे व जोंधळे मॕडम उपस्थित होते.