कुख्यात गुन्हेगार गटऱ्याल क्राईम ब्रांच युनिट – १ पोलिसांनी ठोकले बेड्या

92

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

नाशिक(दि.2डिसेंबर):- शहरातील गुन्हेगार सुनील उर्फ गटऱ्या नागू गायकवाड यास गुन्हा शाखा १ या पथकाला यश आले आहे ११ ऑक्टोंबर रोजी अनिल कांबळे व त्याच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवत दमदाटी करून दोन मोबाईल व पैसे हिसकावून घेतलेल्या घटना घडली. संबंधित आरोपी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सुनील उर्फ गटऱ्या ताब्यात घेतले असता त्याच्याकडून दुचाकी हस्तगत झाल्या. सदरील कामगिरी पोलीस कमिशनर दीपक पांडेय ,उपयुक्त संग्राम सिंह निशाणदार मार्गदर्शनाने तपास करण्यात आला. तपास अधिकारी आनंदा वाघ महेश कुलकर्णी प्रवीण वाघमारे शांताराम महाले प्रवीण कोकाटे यांनी संबंधित आरोपीच्या मुसक्या आवळल्या.