उच्च शिक्षण घेतलेला वाशीम येथील युवक मनोरुग्ण झाल्याने शेगावात मागतो भीक

34

🔹मदतीसाठी श्री संत गजानन महाराज मतिमंद शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर मुंडे व ॲड व्होकेट पोकळे यांनी घेतला पुढाकार

✒️शेगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

शेगाव(दि.9डिसेंबर):- संत नगरी असलेल्या शेगाव शहरात उच्च शिक्षण घेतलेल्या वाशीम येथील मनोरुग्ण युवकाला त्याच्या उपचारासाठी श्री संत गजानन महाराज निवासी मतिमंद शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर गजानन राव मुंडे सर व दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन केंद्र पंचायत समिती शेगाव चे चे मुख्य सल्लागार एडवोकेट संजय पोकळे सर यांनी पुढाकार घेतला याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की वाशीम जिल्हा परिषद च्या आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सौ निर्मला अविनाश भुरे यांचा एकुलता एक राहुल नावाचा 37 वर्षीय अविवाहित मुलगा त्याचे शिक्षण एम ए पर्यंत झालेले आहे.

तो मागील तीन-चार वर्षापासून मानसिक रुग्ण झाला त्यामुळे सौ निर्मला भुरे यांनी अकोला येथे डॉक्टर केळकर हॉस्पिटल डॉक्टर सुजय पाटील डॉक्टर राठी या तज्ञ डॉक्टरांकडे उपचार केले मात्र या उपचाराचा त्याला काही अंशी फायदा झाला मात्र तो पूर्णपणे बरा झाला नाही मागील तीन-चार महिन्यांपासून तो वाशिम येथून निघून गेला त्याला शोधत असताना तो शेगाव येथे असल्याची माहिती मिळाल्यामुळे दोन दिवसापासून सौ निर्मला भुरे या श्रीसंत गजानन महाराज मंदिराजवळ असलेल्या सिद्धिविनायक लॉज येथे थांबलेल्या आहेत.

त्यांचा राहुल नावाचा मुलगा त्यांना संत श्री गाडगेबाबा चौकामध्ये दयनीय अवस्थेत असलेला आढळून आला त्याला योग्य उपचारासाठी मदतीची आवश्यकता असल्याचे समजताच श्री संत गजानन महाराज मतिमंद शाळेचे प्राचार्य डॉक्टर गजानन राव मुंडे सर शेगाव पंचायत समिती मधील दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख व शहरातील विख्यात वकील एडवोकेट संजय पोकळे सर यांनी तत्काळ राहुल ची आई सौ निर्मला अविनाश भुरे यांची घेतली.

व त्यांना उंद्री चिखली जवळील पळसखेड येथील मानसोपचार डॉक्टरकडे उपचार करण्याचा सल्ला दिला व सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले पळसखेड येथील अनेक मनोरुग्णांना बरे करणारे व डॉक्टर मुंडे आणि एडवोकेट पोकळे यांच्या परिचयातील तज्ञ डॉक्टरला सदर मुलाबद्दल सांगितले असता पळसखेड येथील डॉक्टर आणि बारा तारखेला शेगाव शेगावात येऊन मनोरुग्ण असलेल्या राहुल भुरे नावाच्या युवकाला बघण्याची संमती दिली त्यामुळे निर्मला अविनाश भूरे यांना आधार वाटला व त्यांनी वाशिम ला जाऊन परत 12 तारखेला मी येते असे सांगितले आणि मुंडे सर्व एडवोकेट पोकळे यांचे आभार मानले.