कुंडलवाडी व हुनगुंदा केंद्राची मासिक आढावा बैठक संपन्न

26

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.16डिसेंबर):-येथील जिल्हा परिषद शाळेत कुंडलवाडी व हुनगुंदा केंद्रातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील मुख्याध्यापक यांची ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण आढावा सभा घेण्यात आली. या प्रसंगी सर्व जिल्हा परिषद व खाजगी शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.बैठकीत शिक्षण विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख कौटकर,व विषयतज्ञ हलगरे यांनी विविध प्रशासकीय मुद्द्यांवर मार्गदर्शन करून खालील मुद्दे निहाय आढावा घेतला.

100 टक्के आधार नोंदणी, ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण व नोंदी, शिष्यवृत्ती वर्ग,नळ जोडणी,विविध शिष्यवृत्या, केंद्रांतर्गत व्हर्च्युअल क्लासरूम नियोजन करून इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती तसेच नवोदय परीक्षा नोंदणी व मार्गदर्शन करणे, ऑनलाइन शिक्षण परिषद नियोजन व अंमलबजावणी,शालेय स्वच्छता, इ. 9 वी ते 12 वी चे विद्यार्थी उपस्थिती व अध्यापन आढावा, गोष्टीचा शनिवार या उपक्रमांतर्गत उपक्रम व कृती करणे व छोटे छोटे व्हिडिओ तयार करून ग्रुप वर शेअर करणे, स्वाध्याय उपक्रमाची सर्व शिक्षकांने 100% विद्यार्थ्यांची नोंदणी करणे व स्वाध्याय सोडवलयाची याची खात्री करणे, आयुष्यमान भारत अंतर्गत राहिलेल्या शाळांची लिंक भरणे, शिक्षक मित्र अध्ययन-अध्यापन आढावा, मैत्री करूया विज्ञान गणिताशी या उपक्रमांतर्गत विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी सहभाग घेणे,निष्ठा प्रशिक्षण उर्दू व इंग्रजी माध्यम शिक्षक लिंक भरणे व प्रशिक्षण पूर्ण करणे, आर. टी.ई. 25 टक्के प्रवेश अंतर्गत मुलांना मुलींना ऑनलाइन शिक्षण देणे, मानव विकास अंतर्गत बस सुरु असून सर्व मुलींनी याचा लाभ घ्यावा, लाभार्थी मुलींची यादी देणे, तंबाखू मुक्त शाळा,शालेय पोषण आहार वाटप, स्थलांतरित व शाळाबाहय विद्यार्थी सर्वेक्षण इत्यादी महत्वाच्या विषयावर सखोल चर्चा झाली.

या बैठकीत शिक्षण विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख कौटकर, विषयतज्ञ हलगरे, हुनगुंदा केंद्राचे मुख्याध्यापक कुलकर्णी, जिल्हा परिषद शाळा माचणुर चे मुख्याध्यापक जी.जी.पाटील, तसेच केंद्रीय प्रा.कन्या शाळेचे मुख्याध्यापक देविदास निरडवाड, जिल्हा परिषद हायस्कूल चे मुख्याध्यापक दतु शेट्टीवार मिलिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम राठोड, सौ बंडे मॅडम, तंत्रस्नेही शिक्षिका सौ पटवे मॅडम तसेच जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील सर्व मुख्याध्यापक सदर सभेस उपस्थित होते.