सोलापूर – कुर्डुवाडी रोडवर ट्रक घसरला

41

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.18डिसेंबर):- कुर्डुवाडी रोडवर अंजनगाव व अनगर गावा दरम्यान रस्त्याचे काम चालू आहे. त्यामुळे वाहतूकीस अडचणी येत आहेत. एका बाजूचे काम चालू आहे तर दुसर्या बाजूने वाहतूक चालू आहे. काल दुपारी १२ च्या सुमारास सोलापूरहून कुर्डुवाडीकडे ट्रक चालला होता.

समोरून येणाऱ्या मोटारसायकलीला रस्ता देण्याच्या प्रयत्नात ट्रक रस्त्याच्या बाजूच्या खड्यात पडला. यात ट्रकचा चालक किरकोळ जखमी झाला. उपचारासाठी त्याला माढा येथील ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.