मरणोप्रांत सेवाधर्म हीच शहीदांना श्रद्धांजली – बाळकाका चौधरी

35

🔸स्मशानभूमीतील अस्थी लॉकर्सचे लोकार्पण

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.3जानेवारी):- जिवंत माणसांबरोबरच माणसांची मरणोप्रांत सेवा करणे, हीच शहीदांना खरी श्रद्धांजली आहे असे प्रतिपादन बाजार समितीचे माजी सभापती बाळकाका चौधरी यांनी केले. शहीद वीर विठ्ठलभाई कोतवाल यांच्या शहीद दिनाचे औचित्य साधून नाभिक महामंडळाच्या वतीने स्मशानभूमीत बसवण्यात आलेल्या अस्थी लॉकर्सच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, नगरसेवक नितीन चौधरी आदिंची यावेळी प्रमुख ऊपस्थिती होती.

नाभिक समाजातील शहीद विठ्ठलभाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचा आज शहीद दिवस होता. या निमित्ताने सामाजीक ऊपक्रम राबवत नाभिक महामंडळाच्या गंगाखेड शाखेने हा ऊपक्रम राबवला. गोदाकाठावर असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर दशक्रिया विधीसाठी लागणाऱ्या अस्थी व ईतर साहित्य ठेवण्यासाठी सुरक्षीत जागा नव्हती. यामुळे झाडाला बांधुन अथवा ईतर ठिकाणी हे
साहित्य ठेवावे लागत होते. ही अडचण लक्षात घेत नाभिक समाजातील युवकांनी असे लॉकर्स बनवले असून ते आज स्मशानभूमीत बसवण्यात आले.

या प्रसंगी गंगाखेड सोसायटीचे चेअरमन पंडीतराव चौधरी, बजरंग दलाचे संजय लाला अनावडे, माजी ऊपसभापती रामजी सातपुते, सुशांत चौधरी, रामराजे फड, सवंगडी कट्टा समुहाचे रमेश औसेकर, पत्रकार ऊत्तम आवंके आदिंची ऊपस्थिती होती. शिक्षक शंकर डमरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तीवीक केले. आभार नरहरी डमरे यांनी मानले.

नाभीक समाजातील सर्वश्री भिमा नेजे, अशोक डमरे, राजेभाऊ डमरे, पांडुरंग नेजे, सोपान नेजे, सुभाष डमरे, इंद्रजित गवळी, शिवाजी वावगुडगे, संभाजी डमरे, विष्णू डमरे, बालाजी डमरे, नागनाथ कुटे, पांडुरंग शिंदे, कृष्णा जाधव, बाळासाहेब डमरे, बालाजी राऊत, दत्ता कानडे, राम ईबीतपट्टे, काशिनाथ सुर्वे, किशनराव नेजे, गणेश डमरे, गोविंद डमरे आदिंनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.