राजमाता जिजाऊ यांना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले अभिवादन

33

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

बुलढाणा(दि.13जानेवारी):-राजमाता जिजाऊ यांना त्यांच्या जयंतीदिनी आज १२जानेवारी रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले. पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी सकाळीच कुटुंबियांसमवेत अभिवादन केले. मंत्रीमहोदयांनी माल्यार्पण करीत राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी त्यांच्या शिल्प प्रतिमेला अभिवादन केले. याप्रसंगी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

त्याचप्रमाणे खासदार प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार तथा पंचायत राज समितीचे अध्यक्ष डॉ. संजय रायमूलकर, सि. राजा चे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, नगराध्यक्ष सतिष तायडे, उपनगराध्यक्ष नंदाताई मेहेत्रे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केले.