पुण्यात युवक मित्र परिवार तर्फे सौ.अश्विनी माळी यांना युवा प्रेरणा पुरस्कार प्रदान

27

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.13जानेवारी):-शिंदखेडा तालुक्यातील गावातील सौ अश्विनी राहुल माळी यांना पुण्यात युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले.युवक मित्र परिवारा तर्फे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती निमित्तआयोजित राज्यस्तरीय युवा संमेलनात अनुभव शिक्षा केंद्र च्या धुळे जिल्हा समनव्यक सौ. अश्विनी राहुल माळी यांना स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.तसेच त्यांच्या अनुभव शिक्षा केंद्रातील युवा-युवतींन साठी मोफत १०० पुस्तकांचे ग्रंथालय भेट देण्यात आले.

युवकमित्र परिवारा तर्फे दरवर्षी राज्यस्तरीय युवा संमेलनाचे आयोजन करण्यात येते.यात राज्यातिल उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या युवा-युवतींचा सन्मान केला जातो.या वर्षी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील सौ. अश्विनी राहुल माळी हिला त्यांच्या सामाजिक कार्याची दखल देऊन राष्ट्रीय युवा दिनी १२ जानेवारी रोजी पत्रकार भवन पुणे येथे सावित्री बाई फुले प्रतिष्ठान च्या अध्यक्षा उज्वलाताई गायकवाड यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, सन्मान पत्र,सन्मान चिन्ह आणि पुस्तके भेट देऊन युवा प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच त्यांच्या अनुभव शिक्षा केंद्र साठी मोफत १०० पुस्तकांचे ग्रंथालय भेट देण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक महा एनजीओ फेडरेशनचे संचालक मुकुंद शिंदे,अध्यक्षस्थानी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर तर प्रमुख वक्ते युसूफ पठाण होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान, पुणे चे अध्यक्षा उज्वला ताई गायकवाड,विश्व जनआरोग्य सेवा समितीच्या संस्थापिका छायाताई भगत, बालकृष्ण बागुल,प्रवीण प्रधान आदी उपस्थित होते.प्रास्तविक युवकमित्र परिवाराचे अध्यक्ष प्रवीण महाजन यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मयूर बागुल यांनी केले.

अश्विनी माळी यांना हा सन्मान मिळाल्याने अनुभव शिक्षा केंद्रचे प्रकल्प समनव्यक नितीन मते,विभागीय समनव्यक प्रियताई ठाकूर,शिवाजी माळी, अनिकेत घुले,अनिता शिरसाठ,आकाश पवार,राहुल माळी, झेंडू ठाकरे,मोहिनी देवरे,राशी देवरे,प्रतिभा पाटील व मित्र परिवार यांनी त्यांचे कौतुक केले.