कासराळी ग्रा.प.मध्ये ठक्करवाड यांच्या झंझावाताने विरोधी पँनल हतबल

25

🔹प्रचारात ठक्करवाड पँनल आघाडीवर

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.13जानेवारी):-तालुक्यातील मोठी ग्राम पंचायत असलेली कासराळी कडे जिल्ह्याचे लक्ष लागलेल असुन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा जि.प.सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी वार्ड क्रमांक एक ते तिन यात प्रत्यक्ष मतदार भेटीने संपुर्ण वातावरण ढवळुन निघाले आहे. समोरील विरोधी पँनल पुर्णपणे हताश झाला असुन मतदाराची दिशाभुल करत सुटला आहे.

कासराळी ग्रामपंचायती मध्ये पाच वार्डात तेरा संदस्याची संख्या असुन गेल्या ३५ वर्षा पासुन ग्रा.प.वर ठक्करवाड यांची एकहाती सत्ता आहे.येथील मतदारांनी विकासला महत्त्व दिले असल्याने गावचा पुरेपुर विकास झाला आहे.या निवडणुकीत ठक्करवाड पँनल कडून सर्व तेरा ही उमेदवार हे सुसक्षित असल्याने एक सक्षम ग्रा.म.म्हणून ही ओळखल्या जाणार आहे.गेल्या दोन दिवसात जि.प.सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड हे एक ते तिन या वार्डात प्रत्यक्ष मतदाराचे द्वार भेट घेऊन वातावरण एकतर्फी करुन सोडले आहे. चार व पाच या वार्डात प्रचाराच्या शेवटच्या दिवसी पिंजुन काढणार आहेत.

विरोधी गटाला गावात कोणी नेता नसल्याने मतदार त्यांना महत्त्व देत नाही,यामुळे आता विरोधी गटातुन अफवाचे पेव पसरवले जात असल्याने मतदारात संताप व्यक्त होत आहे.प्रत्यक्ष मतदार भेटीत जि.प.सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड,माजी सरपंच सुर्यकांत महाजन,प्रतिष्टीत व्यापारी भागवत सावकार लोकमनवार,विठ्ठल पा,शिंदे,शिवा सोमासे,शेषराव लंके,किशनराव मेहत्रे,युनुस शेख,माधव दंत्तापल्ले,शैलेद्र लंके,यांच्या सह सर्व उमेदवाराची उपस्थिती होती.